Virat Kohli | ‘रनमशीन’ विराट कोहली याचा कारनामा, दिग्गजांना पछाडत मोठा विक्रम

| Updated on: Mar 11, 2023 | 3:51 PM

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली याने मोठा रेकॉर्ड केला आहे.

Virat Kohli | रनमशीन विराट कोहली याचा कारनामा, दिग्गजांना पछाडत मोठा विक्रम
Follow us on

अहमबदाबाद | बॉर्डर गावसकर ट्रॉफीत टीम इंडिया 2-1 च्या फरकाने आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना हा अहमदाबादमध्ये खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 488 धावांवर ऑलआऊट केलं. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात उस्मान ख्वाजा आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी शतकी खेळी साकारली. तर टीम इंडियाकडून आर अश्विन याने 6 विकेट्स घेतल्या. अश्विन याने 6 विकेट्स घेत अनिल कुंबळे याचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला. तसेच अश्विन आता भारतात सर्वात जास्त 5 विकेट्स घेणारा गोलंदाजही ठरला. अश्विन याच्यासह टीम इंडियाच्या विराट कोहली यानेही विक्रम केला आहे.

अश्विनने ट्रेव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, कॅमरून ग्रीन, अलेक्स कॅरे, मिशेल स्टार्क, नाथन लायन आणि टोड मर्फीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अश्विनच्या बॉलिंगवर विराटने नाथन लायन याचा कॅच पकडत मोठा रेकॉर्ड केला. विराटने यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 कॅच घेण्याचा पराक्रम केला.

विराट 300 कॅच घेणारा टीम इंडियाचा दुसरा आणि पहिला सक्रिय खेळाडू ठरला. याआधी टीम इंडियाकडून राहुल द्रविड यानेच अशी कामगिरी केली आहे.

हे सुद्धा वाचा

सर्वाधिक कॅच घेण्याचा रेकॉर्ड

महेला जयवर्धन (श्रीलंका) – 440 कॅच.

रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) – 364 कॅच.

रॉस टेलर (न्यूझीलंड) – 351 कॅच.

जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – 338 कॅच.

राहुल द्रविड (टीम इंडिया) – 334 कॅच.

स्टीफन फ्लेमिंग (न्यूझीलंड) – 306 कॅच.

विराट कोहली (टीम इंडिया) – 300 कॅच.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट 480 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक 180 रन्स केल्या. त्यानंतर कॅमरून ग्रीन याने 114 धावांची शतकी खेळी केली. उस्मान आणि ग्रीन या जोडीने 208 धावांची भागीदारी केली. टॉड मर्फी याने नाबाद 41 धावा केल्या. कॅप्टन स्टीव्हन स्मिथ 38 धावा करुन माघारी परतला. नॅथन लायन याने 34 रन्सचं योगदान दिलं. ट्रेव्हिस हेड याने 32 रन्स केल्या. पीटर हँड्सकॉम्ब याने 17, मिचेल स्टार्क 6 आणि मार्नस लाबुशेन याने 3 धावा केल्या. एलेक्स कॅरी याला अश्विनने भोपळाही फोडु दिला नाही. तर कुहनेमॅन शून्यावर नाबाद परतला. टीम इंडियाडून अश्विनशिवाय मोहम्मद शमी याने 2, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलने या जोडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.