विराट कोहली वनडे आणि टी 20 मध्ये आक्रमकपणे खेळत आहे. तसेच खोऱ्याने धावा देखील करत आहे. असं असताना त्याला कसोटीत सूर अजूनही गवसलेला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिन्ही कसोटीत फेल गेला आहे. त्यामुळे निवड समितीवर दबाव वाढत चालला आहे. (Photo: PTI)
बॉर्डर गावसकर मालिकेत खेळलेल्या पाच डावात विराट कोहली काही खास करू शकलेला नाही. दिल्ली कसोटीत 44 धावा केल्या. मात्र फिरकीपटूंसमोर सपशेल शरणागती पत्कारल्याचं दिसलं. (Photo: PTI)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट कोहलीची आकडेवारी तशी पाहिली तर चांगली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 शतकं केली आहेत. मात्र भारतात सलग दुसऱ्या मालिकेत फ्लॉप ठरला आहे. 2017 मध्ये फक्त 46 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने शेवटचं अर्धशतकं 2013 मोहाली टेस्टमध्ये ठोकलं होतं. (Photo: PTI)
विराट कोहलीला अर्धशतक करणंही कठीण झालं आहे. मागच्या एका वर्षात त्याने एकही अर्धशतक केलेलं नाही. त्याने शेवटचं अर्धशतक केपटाउन कसोटीती जानेवारी 2022 मध्ये केलं होतं. त्यात त्याने 79 धावांची खेळी केली होती. (Photo: PTI)
ऑगस्ट सप्टेंबर 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यातून टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फेरी सुरु केली. मात्र तेव्हापासून आतापर्यंत काही खास करू शकला नाही. त्याचा सर्वात मोठा स्कोअर 79 आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिशनशिप 2021 ते 2023 दरम्यान 27 डावात 26.46 च्या सरासरीने 683 धावा केल्या. यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo: ANI)