Virat Kohli Wicket | विराटला विकेट, कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स जाळ्यात, अनुष्काचा जल्लोष

| Updated on: Nov 13, 2023 | 10:09 AM

Virat Kohli take Wicket Against Nedrlands : स्टार खेळाडू विराट कोहलीने वर्ल्ड कपमध्ये विकेट घेतली. कोणालाही विश्वास बसणार नाही पण हे खंर आहे. विराटने विकेट घेतली त्यावेळी स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्काने आनंद व्यक्त केला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Virat Kohli Wicket | विराटला विकेट, कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स जाळ्यात, अनुष्काचा जल्लोष
Virat Kohli Wicket Against World Cup 2023
Follow us on

मुंबई : भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये विराट कोहली याने विकेट घेतली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 410-4 धावा केल्या होत्या. या धावांचा नेदरलँड्स संघ पाठलाग करत आहे. सामन्याच्या  25 व्या ओव्हरमध्ये विराट कोहलीने नेदरलँड्स संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सला माघारी पाठवलं. कीपिंग करणाऱ्या राहुलनेही चपळता दाखवत कॅच घेतला. भारताला चौथं मिळवून देणाऱ्या विकेटची वन डे क्रिकेटमधील पाचवी विकेट आहे.

पाहा व्हिडीओ-

 

 

विराट कोहली याने वन डे क्रिकेटमध्ये नऊ वर्षानंतर विकेट घेतली. याआधी त्याने शेवटची विकेट 31 जानेवारी 2014 रोजी कोहलीने शेवटची वनडे विकेट घेतलेली.  वन  डे क्रिकेटमध्ये याआधी विराटने क्विंटन डी कॉक, ब्रेंडन मॅक्युलम, क्रेग किस्वेटर आणि ऍलिस्टर कूक यांना तंबूचा मार्ग दाखवला आहे.

सामन्याचा आढावा

भारताने नेदरलँड्स संघाला 250 धावांवर ऑल आऊट करत सामना 160 धावांनी जिंकला. या सामन्यात रोहित, विराट कोहली, शुभमन गिल आणि सुर्यकुमार यादव यांनी बॉलिंग केली.  कोहली आणि रोहितने विकेट घेतली. खऱ्या अर्थाने भारतीय खेळाडू मैदानात एक प्रकारे दिवाळीच  साजरे करत होते. पहिल्यांदा बॅटींग करताना 400 पेक्षा जास्त धावा केल्या त्यानंतर 250 वर नेदरलँड्सला गुंडाळत विजयी बॉम्ब फोडला.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

नेदरलँड्स (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (C/W), बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन