virat Kohli Maxwell : मॅक्सवेलच्या द्विशतकानंतर विराटने ‘सनकी’ म्हणत ठेवली इन्स्टा स्टोरी

| Updated on: Nov 08, 2023 | 3:06 PM

Virat's Instagram Story For Maxwell: मॅक्सवेले द्विशतक करत इतिहास रचलाय. भारताचा स्टार खेळाडू कोहलनेही मॅक्सवेलच्या खेळीचं कौतुक केलं आहे. विराटने ठेवलेली स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

virat Kohli Maxwell : मॅक्सवेलच्या द्विशतकानंतर विराटने सनकी म्हणत ठेवली इन्स्टा स्टोरी
virat kohli Insta story for glen maxwell
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानमध्ये झालेला सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल याने हैदोस घातला. चेस करताना द्विशतक ठोकत मॅक्सवेल याने इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानने पहिल्यांदा बॅटींग करताना वानखेडेवर 291 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कांगारूंची अवस्था खराब झालेली. 91 वर सात विकेट गेलेल्या असताना तिथून मॅक्सवेलने एकटच्या दमावर संघाला सेमी फायनलचं तिकीट मिळवून दिलं. मॅक्सवेलच्या या खेळीची क्रिकेट जगतात जोरदार चर्चा होत आहे. अशातच विराट कोहलीनेही मॅक्सवेलचं कौतुक केलं आहे.

विराट कोहली याची पोस्ट

 

कोहलीने इन्स्टा स्टोरीवर पोस्ट शेअर करत, “फक्त तूच असा पराक्रम करू शकला असता, ‘सनकी’, असं म्हणत कोहलीने हार्ट इमोजीही शेअर केला आहे. मॅक्सवेल हा आयपीएलमध्ये आरसीबीकडून क्रिकेट खेळतो, दोघे चांगले  मित्रही आहेत. धोपाटण्याने कपडे धुतल्यासारखी मॅक्सवेलने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली.

सामन्याचा धावता आढावा

अफगाणिस्तान संघाने टॉस जिंकत प्रथन फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.  इब्राहिम जादरान याची 129 धावांच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 291 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज कागदी वाघ ठरले. मात्र मॅक्सवेल याने नाबाद 201 धावा करत इतिहास रचला. पठ्याने आपल्या खेळीत 21 चौकार आणि 10 सिक्सर मारले.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.