मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आज झालेल्या पराभवामुळे निराश झालेला दिसला. विराट कोहली कर्णधार असताना संघाने पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या पहिल्याच वर्षी फायनलमध्ये धडक घेतली होती. मात्र या सामन्यामध्ये न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा पराभव केला होता. आता सलग दुसऱ्यांदा फायनल गाठूनही परत हार पदरी पडल्यामुळे सर्वजण निराश झाले आहेत. संघाच्या कर्णधारपदाच्या धुरी रोहित शर्माकडे असली तरीसुद्धा विराट कोहलीला हा पराभव जिव्हारी लागलेला दिसत आहे.
शांतता हे शक्तीचा सर्वोत्तम सोर्स असल्याचं विराट कोहली याने म्हटलं आहे. मैदानावर आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जाणाऱ्या विराटने ठेवलेली इन्स्टा स्टोरीवर पाहून त्याच्या चाहत्यांना चिंता वाटू लागली आहे. विराट कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती तर घेण्याच्या तयारीत नाही ना? टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर विराट कोहली खूपच निराश दिसत होता. सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.
या सामन्यामध्ये विराट कोहली अपयशी ठरलेला दिसला. पहिल्या डावामध्ये त्याने 14 तर दुसऱ्या डावात 49 धाावा केल्या. रविवारी तर विराटने तीच चूक केली ज्यामुळे त्याला आपली विकेट गमवावी लागली. विराटची विकेट पडल्यावर टीम इंडिया काही स्थिरावली नाही आणि 234 वर ऑल आऊट झाली. कोहली कसोटी क्रिकेटमधूव निवृत्ती घेण्याच्या विचारात नाही ना असे अनेक सवाल चाहत्यांना पडले आहेत.
Instagram story of Virat Kohli. pic.twitter.com/sv0iFAzqtc
— Johns. (@CricCrazyJohns) June 11, 2023
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.
WTC Final साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार