मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. विराट कोहली याला पुत्ररत्न झालं असून त्यांनी आपल्या मुलाचं नाव अकाय ठेवलं आहे. विराट आणि अनुष्का यांनी ही गोष्ट गेल्या अनेक दिवसांपासून लपवून ठेवली होती. आज अनुष्का शर्माने पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होते. या दोघांनीही ही गोष्ट जगापासून लपवून ठेवली होती. आतामध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने एका मुलाखतीदरम्यान याबद्दल सांगितलं होतं. मात्र त्याने परत आपलं वक्तव्य माघारी घेतलं होतं. पण ते खरं असल्याचं आज समोर झालं आहे.
15 फेब्रुवारीला अनुष्काने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. मात्र याबाबत पाच दिवसांनी त्यांनी जाहीरपणे याबाबत माहिती दिली. विराट कोहली आता सुरू असलेल्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेमध्ये न खेळण्याचं खरं कारण आता समोर आलं आहे. विराट कोहली आणि अनुष्का यांनी वामिका नावाची मुलगी आहे.
दरम्यान, जानेवारी 2021 मध्ये तिने मुलगी वामिकाला जन्म दिला. लग्नानंतर अनुष्का चित्रपटांपासून दूर आहे. 2018 मध्ये झिरो हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटामध्ये दिसली नाही. वामिकाचा चेहरा त्यांंनी सर्वांपासून लपवून ठेवला होता. मात्र एका सामन्यामध्ये कॅमेरामध्ये कॅच झाल्यावर कोहलीच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी अनुष्का आणि विराटने फोटो व्हायरल करू नका अशी विनंती केली होती. यावेळी मात्र त्यांनी गुप्तता ठेवलेली पाहायला मिळाली.