मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील भारत आणि न्युझीलंडमधील सेमी फायनल सामना सुरू व्हायला अवघे काही तास बाकी आहेत. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना पार पडणार आहे. या सामन्यामध्ये स्टार खेळाडू विराट कोहली याच्याकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा असणार आहेत. मात्र विराटवर विश्वास ठेवणं म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. कारण इतिहासावर नजर मारली आणि आकडेवारी पाहिली तर विराटनेच धोकाच दिला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
2011 चा वर्ल्ड कर पाहिला तर उपांत्यपूर्व, उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यातील डावात विराटने फक्त 68 धावा केल्या आहेत. यामधील वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये केलेल्या 35 धावा महत्त्वाच्या ठरल्या होत्या. त्यानंतर 2015 मध्ये उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशविरुद्ध 3 धावा आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1 धाव काढून बाद झाला होता. 2019 मध्येही उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध केवळ 1 धाव काढून बाद झाल होता. त्यामुळे कोहलीचे नॉकआऊटमधील सामन्यांमध्ये अवघ्या 73 धावा केल्या आहेत.
2011 च्या उपांत्य फेरीत पाकिस्तानच्या वहाब रियाझने त्याची विकेट घेतलेली, 2015 ला मिचेल जॉन्सन तर 2019 ला न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने त्याला माघारी पाठवलं होतं. नॉक आऊट सामन्यामध्ये कोहलीची कामगिरी एकदम सामान्य आहे. त्यामुळे कोहलीच्या भरोशावर राहून राहता येणार नाही. टीम मॅनेजमेंटला प्लॅन बी तयार ठेवावा लागणार आहे. नाहीतर लीग स्टेजमधील सामन्यांमध्ये अपराजित राहिलेल्या भारताला एक पराभव बाहेर करू शकतो.
दरम्यान, वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली यादीत एक नंबरला आहे. मात्र कोहलीची ही कमजोरी विरोधी संघालाही माहित असणार आहे. त्यामुळे त्यानेही सावध खेळ करत हा नकोसा डाग आपल्या नावावरचा काढायला हवा.
भारताचा संघ: रोहित शर्मा (C), हार्दिक पांड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशान किशन, सूर्यकुमार यादव.