मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सोमवारी झालेल्या सामन्यामध्ये एका अर्थान गदरोळच झालेला पाहायला मिळाला. स्टार खेळाडू विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघे एकमेकांना भिडलेले दिसले. काही वेळ मैदानामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. एकवेळ अशी होती की आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू एकमेकांना मारहाण करतात की असं सर्वांना वाटू लागलं होतं. अफगाणिस्तानचा नवीन उल हक मैदानात फलंदाजी करायला आल्यापासून खटके उडायला सुरूवात झाली होती. सामना झाल्यावरही नवीन उल हकने विराट कोहली याचा डिवचल्याच्या व्हिडीओ समोर आला आहे.
पाहा व्हिडीओ-
Naveen ul haq denied to talk with Kohli #ViratKohli #Gambhir #RCBVSLSG pic.twitter.com/227EBY4ry4
— aqqu who (@aq30__) May 1, 2023
सामना संपल्यावर हस्तांदोलन करताना विराट आणि नवीन उल हकमध्ये खरखर झाली. तिथूनच जास्त तापलं आणि विराट गंभीर एकमेकांना भिडले. ज्यावेळी गंभीर आणि कोहली एकमेकांना भिडले त्यावेळी अमित मिश्राने मध्यस्थी करत दोघांना दूर केलेलं पाहायला मिळालं. त्यानंतर के.एल. राहुल आणि विराट कोहली एकमेकांशी बोलत असताना तिथून नवीन जात होता. के.एल. राहुलने त्याला बोलावलं होतं पण त्याने विराटसोबत बोलण्यास नकार दिला आणि निघून गेला.
नवीनने शांतपणे न जात त्याने विराटला खून्नस देत पाहिलं मग काय विराट शांत बसणार आहे का? पण राहुल तिथे असल्याने जास्त काही वाढलं नाही. विराट कोहलीचा स्वभाव सर्व क्रिकेट जगताला माहित आहे. नवीनने सामना संपल्यावरसुद्धा अशा प्रकारे वागणं म्हणजे शांत झालेलं प्रकरण आणखी वाढवल्यासारखं आहे.
विराट आणि गंभीर याआधीही 2013 साली एकमेकांना भिडलेले पाहायला मिळाले होते. त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा गौतम गंभीर कर्णधार होता. विराट आणि गौतमधील हे वैर अजूनही कायम आहे. फक्त आता काही निमित्त होतं आणि दोघे एकमेकांना भिडतात. मात्र यामुळे क्रिकेटची प्रतिमा मलिन होत असून यामधील दोषी खेळाडूंवर कारवाई करणं गरजेचं आहे.