मुंबई : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया दुसऱ्या दिवसअखेर 62 धावांनी आघाडीवर आहे. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दिलेल्या 263 धावांच्या प्रत्युतरात पहिल्या डावात सर्वबाद 262 धावा केल्या. त्यामुळे कांगारुंना 1 धावांची नाममात्र आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने या आघाडीसह दुसऱ्या दिवसापर्यंत 1 विकेट गमावून 61 धावा केल्या आहेत. यामुळे ऑस्ट्रेलियाकडे 62 धावांची आघाडी आहे. या सामन्यात टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहली याला वादग्रस्त पद्धतीने आऊट दिल्याचा वाद चांगलाच रंगला. चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याने विराट याचाही संताप पाहायला मिळाला.
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला आऊट देण्याचा निर्णय हा वादग्रस्त ठरला. विराट याला वादग्रस्तरित्या आऊट दिल्याचं नेटकऱ्यांचं म्हणंन आहे. तसेच आऊट झाल्यानंतर विराटचा ड्रेसिंग रुममध्ये संताप पाहायला मिळाला.
टीम इंडियाच्या पहिल्या डावातील 50 व्या ओव्हरमध्ये हा सर्व प्रकार घडला. मॅथ्यू कुहनेमन ही ओव्हर टाकत होता. विराट या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर एलबीडबल्यू आऊट झाला. विराट 44 धावांवर माघारी परतला.
कुहनेमन याने टाकलेल्या बॉलवर एलबीडब्ल्यूचा निर्णय फार क्लोज होता. बॉल आधी विराटच्या बॅटला लागला की पॅडला, हे स्पष्ट दिसलं नाही पण फिल्ड अंपायरने त्याला आऊट घोषित केलं.
विराटने अपांयरच्या या निर्णयाला आव्हान देत डीआरएस घेतला. आता विषय थर्ड अपांयराच्या कोर्टात गेला. थर्ड अंपायरने उपलब्ध असलेल्या सर्व सुविधांचा वापर केला. मात्र थर्ड अंपायरला स्पष्टपणे कळू शकलं नाही. विराट आऊट असल्याचा पुरावा थर्ड अंपायरकडे पण नव्हता.
विराट आऊट की नॉट आऊट
It was definitely not out…time to use hotspot technology…such a poor umpiring from Nitin Menon..#INDvsAUS #ViratKohli? #RohitSharma? #askstar #askstarsports pic.twitter.com/d2QrX5ixPJ
— Swapnanil Bose (@SwapnanilBose18) February 18, 2023
थर्ड अंपायर यालाही समजू शकलं नाही की बॉल आधी पॅडला लागलाय की बॅटला. परिणामी फिल्ड अंपायर याने दिलेला सॉफ्ट निर्णय ग्राह्य धरुन विराटला आऊट जाहीर करण्यात आला.
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा हे दिग्गज मैदानात तग धरु शकले नाहीत. विराट चांगला सेट झाला होता. मात्र अंपायरच्या या निर्णयामुळे विराट याला आणि टीम इंडियाला मोठा फटका बसला. विराट 44 धावा करुन माघारी परतला. विराट ड्रेसिंग रुममध्ये परतला. तिथे विराटचा संताप पाहायला मिळाला. कायम शांत असलेला कोच राहुल द्रविडही नाराज दिसून आला.
दरम्यान विराटला चुकीच्या पद्धतीने आऊट जाहीर केल्यावरुन नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. फिल्ड अंपायर नितीन मेनन यांच्या या निर्णयामुळे नेटकऱ्यांना स्टीव्ह बकनर या माजी पंचाची आठवण आली.
विराटचा संताप
Kohli looked angry after being given out by the third umpire.#INDvAUS #ViratKohli? #Umpire pic.twitter.com/AiE8gbcDkd
— Akhil Gupta ? (@Guptastats92) February 18, 2023
नितीन मेनन यांना नक्की माहिती नव्हतं, मग त्यांनी थेट आऊट असल्याचा निर्णय का आणि कसा दिला? त्यांनी हा निर्णय घेण्याचा अधिकार थर्ड अंपायर यांना का दिला नाही? मेनन यांनी दिलेल्या सॉफ्ट डिसीजनच्या आधारावरच विराटला बाद घोषित करण्यात आलं. त्यामुळे नेटकऱ्यांचा असंतोष पाहायला मिळाला.
दरम्यान दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसअखेर 1 विकेट गमावून 61 धावा केल्या आहेत. कांगारुंकडे पहिल्या डावातील 1 धावांची आघाडी आहे. यासह ऑस्ट्रेलियाकडे 62 धावांची आघाडी आहे.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज,
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11 – पॅट कमिन्स (कॅप्टन), डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन.