मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या फायनल 2023 सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. सामना सुरू होण्यासाठी काही तासांचा अवधी राहिला आहे. या सामन्यात विराट कोहलीकडून सर्वांना अपेक्षा असणार आहेत. कारण ऑस्ट्रेलियाविरूद्ध विराट कोहली याचे आकडेही चांगले आहेत. विराटला या फायनल सामन्यामध्ये मोठा पराक्रम करण्याची संधी आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याने रचलेला हा विक्रम आतापर्यंत कोणालाही मोडता आलेला नाही. हा पराक्रम विराट अवघ्या 55 धावा करून तेंडुलकरनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा आणि एकमेव खेळाडू ठरणार आहे.
भारतीय संघाचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 92 सामन्यांत 4945 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 16 शतके झळकावली आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कोहलीने आणखी 55 धावा केल्या तर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5000 धावा पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा फलंदाज ठरणार आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6707 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज. सचिन तेंडुलकर – 6707 धावा, विराट कोहली – 4945 धावा, ब्रायन लारा – 4714 धावा, डेसमंड हेन्स – 4495 धावा, विवियन रिचर्ड्स – 4453 धावा केल्या आहेत.
दरम्यान, विराट कोहलीने 2011 साली भारताकडून कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून तो भारतीय फलंदाजी आक्रमणातील महत्त्वाचा दुवा बनला आहे. चौथ्या क्रमांकावर, तो टीम इंडियासाठी सर्वात विश्वासार्ह फलंदाज आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत 1979 धावा, एकदिवसीय सामन्यात 2171 धावा आणि T20 मध्ये 794 धावा केल्या आहेत. सचिनला एका मुलाखतीवेळी विचारण्यात आलं होतं की, तुझा विक्रम कोण मोडेल? तेव्हा सचिनने रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं नाव घेतलं आहे.