आयपीएल 2025 स्पर्धेत विराट कोहलीची पाच विक्रमांवर असेल नजर, जाणून घ्या काय ते

| Updated on: Mar 22, 2025 | 5:00 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत विराट कोहलीला काही विक्रम रचण्याची संधी आहे. रेकॉर्डची स्थिती आणि विराट कोहलीचा फॉर्म पाहता हे सहज शक्य आहे असं म्हणावं आहे. टी20 क्रिकेटमधील एक विक्रम यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूच्या नावावर नाही. त्यामुळे विराट कोहलीला खास पंगतीत स्थान मिळणार आहे.

1 / 5
विराट कोहलीने टी20 क्रिकेटमध्ये (आयपीएल+आंतराष्ट्रीय) एकूण 9 शतके झळकावली आहेत. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाबर आझम 11 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीला या हंगामात आणखी तीन शतके झळकावली तर दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. या यादीत ख्रिस गेल 22 शतकांसह अव्वल स्थानावर आहे.

2 / 5
विराट कोहलीने आतापर्यंत टी20  क्रिकेटमध्ये 12886 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये 13 हजार धावांचा टप्पा गाठण्यापासून फक्त 114 धावांची आवश्यकता आहे. असं झालं तर टी20 क्रिकेटमध्ये 13 हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज होईल. कोहलीनंतर रोहित शर्मा 11830 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्रिस गेल (14562), अ‍ॅलेक्स हेल्स (13610), शोएब मलिक (13537) आणि किरॉन पोलार्ड (13537) यांनी 13 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम आधीच केला आहे.

3 / 5
आयपीएलमध्ये सर्वाधिक आउटफिल्ड कॅच घेण्याचा विक्रम आरसीबीचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. त्याने 184 सामन्यांमध्ये 118 झेल घेतले आहेत. कोहली 114 झेल घेत दुसऱ्या स्थानावर आहे. डिव्हिलियर्सला मागे टाकण्यासाठी कोहलीला आणखी 5 झेल घ्यावे लागतील.

4 / 5
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही खेळाडूने 1000 चौकार आणि षटकार मारलेले नाहीत. हा विक्रम गाठण्यासाठी कोहलीला आणखी 23 चौकार किंवा षटकारा मारावे लागतील. आतापर्यंत त्याने 252  सामन्यांमध्ये 977  चौकार (705 चौकार, 272 षटकार) मारले आहेत.

5 / 5
आयपीएलमध्ये सर्वाधिक 50+ धावा करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. त्याने 66 वेळा हा विक्र्म केला आहे. कोहलीने 63 वेळा 50+ स्कोअर केला आहेत. वॉर्नरला मागे टाकण्यासाठी आणखी 4 अर्धशतकं करावी लागतील. (सर्व फोटो- आरसीबी ट्वीटर)