विराट कोहली रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळणार! या संघाकडून नाव जाहीर

| Updated on: Sep 25, 2024 | 7:11 PM

विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठं नाव असून गेली 11 वर्षे देशांतर्गत क्रिकेट खेळलेला नाही. 2012-13 रणजी स्पर्धेत शेवटचा सहभागी झाला होता. दिल्लीकडून खेळताना कोहलीने उत्तर प्रदेशविरुद्ध दोन डावात 57 धावा केल्या होत्या.

विराट कोहली रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळणार! या संघाकडून नाव जाहीर
Follow us on

दुलीप ट्रॉफी स्पर्धेनंतर इराणी ट्रॉफी स्पर्धेसाठी संघ सज्ज झाले आहेत. दुसरीकडे, देशांतर्गत रणजी ट्रॉफीसाठी तयारी सुरु झाली आहे. दिल्ली क्रिकेट असोसिएशनने रणजी ट्रॉपी 2024-2025 स्पर्धेसाठी संभाव्य संघ जाहीर केला आहे. या संभाव्य संघात विराट कोहलीचं नाव असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 2018 नंतर पहिल्यांदाच विराट कोहलीचं नाव रणजी ट्रॉफीसाठी दिल्लीच्या संभाव्य संघात देण्यात आलं आहे. त्यावेळी संघात इशांत शर्मा, शिखर धवन, ऋषभ पंत, गौतम गंभीर आणि नवदीप सैनी या टीम इंडियाच्या खेळाडूंची नावं होती. सहा वर्षानंतर विराट कोहलीचं नाव दिल्ली संघाच्या संभाव्य यादीत आले आहे. टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि नवदीप सैनीसह 84 खेळाडूंचा या संभाव्य संघात सहभाग आहे. पण मागच्या पर्वात दिल्लीकडून खेळलेल्या अनुभवी गोलंदाज इशांत शर्माला संघातून वगळण्यात आलं आहे.

दुसरीकडे, बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी संपल्यानंतर विराट कोहली मोकळा होणार आहे. कारण त्याने टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. असं असताना न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपू्र्वी रणजी सामने खेळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विराट कोहली शेवटचा रणजी सामना 11 वर्षांपूर्वी खेळला होता. 2012-13 च्या रणजी पर्वात विराट कोहलीने दिल्लीकडून खेळताना उत्तर प्रदेशविरुद्ध दोन डावात एकूण 57 धावा केल्या होत्या. तेव्हा दिल्ली संघाची धुरा वीरेंद्र सेहवागच्या खांद्यावर होती.

दिल्ली संभाव्य रणजी संघ

  1. विराट कोहली
  2. ऋषभ पंत
  3. हिम्मत सिंह
  4. प्रांशु विजयन
  5. अनिरुद्ध चौधरी
  6. क्षितिज शर्मा
  7. वैभव कांडपाल
  8. सिद्धांत बंसल
  9. समर्थ सेठ
  10. जोंटी सिद्धू
  11. सिद्धांत शर्मा
  12. तिशांत डाबला
  13. नवदीप सैनी
  14. हर्ष त्यागी
  15. लक्ष्य थरेजा (विकेटकीपर)
  16. सुमित माथुर
  17. शिवांक वशिष्ठ
  18. सलिल मल्होत्रा
  19. आयुष बडोनी
  20. गगन वत्स
  21. राहुल डागर
  22. रितिक शौकीन
  23. मयंक रावत
  24. अनुज रावत (विकेटकीपर)
  25. सिमरजीत सिंह
  26. शिवम कुमार त्रिपाठी
  27. कुलदीप यादव
  28. ललित यादव
  29. प्रिंस चौधरी
  30. शिवम किशोर कुमार
  31. शिवम गुप्ता (विकेटकीपर)
  32. वैभव शर्मा
  33. जितेश सिंह
  34. रोहित यादव
  35. सुमित कुमार
  36. अनमोल शर्मा
  37. केशव डाबा
  38. सनत सांगवान
  39. शुभम शर्मा (विकेटकीपर)
  40. आर्यन चौधरी
  41. आर्यन राणा
  42. भगवान सिंह
  43. प्रणव राजवंशी (विकेटकीपर)
  44. सौरव डागर
  45. मनी ग्रेवाल
  46. कुंवर बिधूरी
  47. निखिल सांगवान
  48. पुनीत चहल
  49. प्रियांश आर्य
  50. यश धूल
  51. प्रिंस यादव
  52. हर्षित राणा
  53. मयंक यादव
  54. सुयश शर्मा
  55. अर्पित राणा
  56. दिविज मेहरा
  57. सुजल सिंह
  58. हार्दिक शर्मा
  59. हिमांशु चौहान
  60. आयुष दोसेजा
  61. अंकित राजेश कुमार
  62. ध्रुव कौशिक
  63. अंकुर कौशिक
  64. कृष यादव
  65. वंश बेदी
  66. यश सहरावत
  67. विकास सोलंकी
  68. राजेश शर्मा
  69. तेजस्वी दहिया (विकेटकीपर)
  70. रौनक वाघेला
  71. मनप्रीत सिंह
  72. राहुल गहलोत
  73. आर्यन सहरावत
  74. शिवम शर्मा
  75. सिद्धार्थ शर्मा
  76. पर्व सिंगला
  77. योगेश सिंह
  78. दीपेश बलियान
  79. सागर तंवर
  80. ऋषभ राणा
  81. अखिल चौधरी
  82. दिग्वेश राठी
  83. सार्थक रंजन
  84. अजय गुलिया