मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सुरु असताना क्रीडाविश्वात अनेक घडामोडी घडत आहेत. गेल्या महिनाभरात डझनभर दिग्गज क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली असताना आणखी एक नाव समोर आलं आहे. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वात आणखी एक कोहली खेळला होता.2008 अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद टीम इंडियाने मिळवलं होतं. त्यावेळेस तरूवर कोहली संघासाठी ओपनिंग करत होता. आता वयाच्या 36 व्या वर्षी तरुवर कोहलीने क्रिकेटविश्वाला रामराम ठोकला आहे. तरुवर कोहली फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. पण टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली नाही. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर त्रिशतकाची नोंद आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 53 राहिली आणि त्याने 14 शतकंही ठोकली आहेत. तरुवर कोहलीला टीम इंडियात स्थान मिळालं नाही पण आयपीएलमध्ये काही खास करू शकला नाही. त्यामुळे क्रीडारसिकांचं लक्ष वेधून घेण्यात अपय़शली ठरला. 2009-2010 दरम्यात त्याच्या क्रिकेट कारकिर्दिला गळती लागण्यास सुरुवात झाली होती. पण 2013 मध्ये रणजी ट्रॉफीत त्रिशतक ठोकत पुन्हा एकदा चर्चेत आला होता.
तरुवर कोहलीने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 55 सामने खेळले आणि 97 डावात 4573 धावा केल्या. यात 74 विकेट्सही नावावर आहे. या व्यतिरिक्त लिस्ट एमधेय कोहलीने 72 सामने खेळले आणि 1913 धावा केल्या. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 14 शतकं आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त लिस्ट ए मध्ये 3 शतकं, 11 अर्धशतकं आणि 41 विकेट्स आहेत.
Greatest ever player with name Kohli, Taruwar Kohli has retired 💔
You when chokli @imVkohli pic.twitter.com/P3ZZMiW3PH— Aryan 🇮🇳 (@Iconic_Hitman) February 20, 2024
तरुवर कोहलीचा जन्म 17 डिसेंबर 1988 रोजी पंजाबच्या जालंधरमध्ये झाला. तरुवर राईट हँडेड बॅट्समन होता. तसेच राइट आर्म मीडियम गोलंदाजी करायचा. आयपीएल 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सने खरेदी केलं होतं. तेव्हा पहिलं पर्व राजस्थानने आपल्या नावावर केलं होतं. त्यानंतर 2009 मध्ये पंजाब किंग्सने खरेदी केलं.
Taruwar Kohli announces retirement from first class cricket.
Taruwar Kohli played for Punjab & Mizoram.
Taruwar was part of India U19 team won U19 World Cup in 2008 (scored 218 runs) & also part of Rajasthan Royals team won IPL title in 2008.
4574 runs, 74 wickets in 55… pic.twitter.com/9C8vzzEalc
— Rajesh Khilare (@Cricrajeshpk) February 14, 2024
अंडर 19 वर्ल्डकप 2008 स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. भारताने 159 धावा करत विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. तरुवर कोहली ओपनिंगला उतरला होता. पण काही खास करू शकला नाही. 10 चेंडूचा सामना करत 1 धाव करून बाद झाला होता. तर विराट कोहलीने या सामन्यात 19 धावा केल्या होत्या. भारताने हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार 12 धावांनी जिंकला होता.