नवी दिल्ली : विराट कोहली (Virat Kohli) सध्या चांगलाच फॉर्मात आहे. टीम इंडियानं (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 सीरिज जिंकून मोठा विजय मिळवलाय. यात रोहित शर्मासह (Rohit Sharma) विराट कोहलीची मोठी भूमिका आहे. आयपीएलनंतर विराटनं सुरु केलेली फटकेबाजी वाढतच असून आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियासह विराट कोहली देखील सज्ज झालाय. यातच विराटच्या एका फोटोनं चांगलीच चर्चा घडवून आणली आहे. तो फोटो नेमका कोणता आहे, नेमकी काय चर्चा रंगली आहे, याविषयी जाणून घ्या…
कोहलीचे फॅन्स कुठे नाही. भारतात तर आहेच शिवाय विदेशातही त्याचे चाहते असंख्य आहे. त्यामुळे कुठेही गेलं तरी विराटची चर्चा होतेच. केरळातही असंच काहीसं झालंय. केरळमध्ये ग्रीनफिल्ड स्टेडियमच्या समोर म्हणजे गेटवर एक होर्डिंग लावण्यात आलंय. कोहलीच्या या होर्डिंगचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
Massive flex of Virat Kohli in front of the Greenfield stadium. pic.twitter.com/eU3ooYamsU
— Johns. (@CricCrazyJohns) September 27, 2022
आशिया चषकात कोहलीनं शतकाव्यतिरिक्त दोन अर्धशतकं झळकावली. तो फॉर्ममध्ये परतलाय. हे त्याच्या कामगिरीतून दिसून येतंय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही त्यानं त्याची जादू दाखवली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात कोहलीनं अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिलाय. या सामन्यात कोहलीनं 63 धावांची खेळी केली आणि सांगितले की तो आता जुन्या शैलीत परतला आहे.
विराट कोहलीची परदेशातही हवा आहे. त्याचं कौतुक परदेशातही होतंय. पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाची जोरदार तयारी सुरू आहे.
Virat Kohli poster in Melbourne in build of the T20 World Cup. pic.twitter.com/2arRtqjdvp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 27, 2022
मेलबर्नमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी कोहलीचे पोस्टर लावण्यात आले आहे. एम वर कोहलीचा एक फोटो आहे आणि हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.