“विराट कोहली यानेच मला कोचपदासाठी…”, विरेंद्र सेहवाग याने केला मोठा खुलासा!

| Updated on: Mar 20, 2023 | 7:36 PM

बीसीसीआयसुद्धा (BCCI) कोहलीच्या तालावर नाचत होती असंही अनेकदा दबक्या आवाजात बोललं जातं. अशातच भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) एका मुलाखती बोलताना मोठा खुलासा केला आहे.

विराट कोहली यानेच मला कोचपदासाठी..., विरेंद्र सेहवाग याने केला मोठा खुलासा!
Follow us on

मुंबई : भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि माजी कोच अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्यातील वाद सर्वांनाच माहित आहे. विराट कोहलीला कोच म्हणून कुंबळे नको असल्याची जोरदार चर्चा त्यावेळी क्रीडा वर्तुळात होती. बीसीसीआयसुद्धा (BCCI) कोहलीच्या तालावर नाचत होती असंही अनेकदा दबक्या आवाजात बोललं जातं. अशातच भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) एका मुलाखतीत बोलताना मोठा खुलासा केला आहे.

विराट कोहली आणि बीसीसीआयचे तत्कालीन सचिव अमिताभ चौधरी यांनी मला कोचपदासाठी अर्ज करायला लावला होता. एक बैठक झाली त्यामध्ये चौधरी यांनी सांगितलं की, कोहली आणि कुंबळे यांच्यामध्ये काही ठिक नसल्याचं सांगत अर्ज भरायला लावला होता. मी त्यावेळी त्यांना हो किंवा नाही असं काही सांगितलं नव्हतं, असं विरेंद्र सेहवागने सांगितलं.

मी भारतीय संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक न झाल्याचा मला कोणताही पश्चात्ताप नाही. जे काही मिळालं त्यामध्ये आनंदी आहे. मी टीम इंडियाचा प्रशिक्षक होऊ शकलो नाही याचं मला दु:ख नाही. कारण मी जे काही मिळवलं त्याबद्दल आनंदी आहे. नजफगढ गावच्या शेतकरी कुटुंबातून आलो होतो आणि मला टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मिळाली, ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचं सेहवाग म्हणाला.

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलला 2017 मध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता. त्यानंतर कोहली आणि कुंबळे यांच्यातील वाद इतका वाढला होता की त्यानंतर कुंबळे यांनी संघाचं कोचपद  सोडलं होतं. त्यावेळी कोहलीने रवी शास्त्री यांना पुन्हा कोच म्हणून नियुक्त करावं अशी मागणी केली होती.