नवी दिल्ली : शेअर बाजारातील (Share market) ‘बिग बुल’ म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचं आज म्हणजेच रविवारी सकाळी निधन झालं. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झुनझुनवाला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) हा एका युगाचा अंत असल्याचं म्हटलं आहे. रिपोर्ट्सनुसार ते अनेक दिवसांपासून आजारी होते. आकासा एअरच्या उद्घाटन समारंभात ते शेवटी सार्वजनिकरित्या दिसले होते. राकेश झुनझुनवाला यांच्या निधनावर सेहवागनं ट्विट केलं की, ‘शेअर बाजारातील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं. त्याच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांबद्दल शोक व्यक्त करतो.’ राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यांची कारकिर्द मोठी होती.
End of an Era as the Big Bull of the Dalal Street , #RakeshJhunjhunwala passes away.
Condolences to his family and loved ones. Om Shanti ? pic.twitter.com/3OrVSzU2Ty— Virender Sehwag (@virendersehwag) August 14, 2022
हे सुद्धा वाचा
झुनझुनवाला यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील बचतीच्या रकमेतून बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.
एकदा राकेश झुनझुनवाला यांनी सांगितलं होतं की, सुरुवातीला त्यांनी खूप कमी गुंतवणूक केली होती. विशेष म्हणजे तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 150 अंकांवर होता, जो आता 60 हजारांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्यांना भारतीय शेअर बाजाराचे वॉरन बफे असंही संबोधलं जात असे. फोर्ब्सनुसार राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती 5.7 अब्ज डॉलर होती.
Rakesh Jhunjhunwala was indomitable. Full of life, witty and insightful, he leaves behind an indelible contribution to the financial world. He was also very passionate about India’s progress. His passing away is saddening. My condolences to his family and admirers. Om Shanti. pic.twitter.com/DR2uIiiUb7
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2022
शेअर बाजारातील ‘बिग बुल’ झुनझुनवाला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलंय की , ‘राकेश झुनझुनवाला एक विनोदी आणि व्यावहारिक व्यक्ती होते. आर्थिक जगतात त्यांनी अतुलनीय योगदान दिले आहे.भारताच्या प्रगतीबद्दल ते खूप उत्साही होते. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांसाठी संवेदना.’
झुनझुनवाला यांच्याविषयी तुम्हाल हे माहिती आहे का की ते झुनझुनवाला हे Aptech Ltd आणि Hungama Digital Media Entertainment Pvt Ltd चे अध्यक्ष देखील होते.