मुंबई : टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात स्फोटक सलामीवार म्हणून ओळखला जातो. वीरेंद्र सेहवागची प्रत्येक विरोधी संघाला दहशत होती. सेहवागने आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक रेकॉर्ड रचले आहेत यामधील एक रेकॉर्ड सेहवागने केला होता. जो आजही तसाच असून सेहवागची काय दहशत होती हे यावरून दिसतं. आज या रेकॉर्डला 12 वर्षे पूर्ण होतील. सेहवाग अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला होता. सेहवाग आणि सचिनची जोडी चांगलीच फेमस होती.
वीरेंद्र सेहवाग याने 8 डिसेंबर 2011 मध्ये इंदूरच्या होळकर स्टेडियमवर वेस्ट इंडुिजविरूद्ध नाबाद 208 धावांची खेळी केली होती. एक कॅप्टन म्हणून सेहवाग द्विशतकी खेळी करणारा जगातील पहिला खेळाडू होता. त्यानंतर सहा वर्षांनंतर रोहित शर्मा याने श्रीलंका संघाविरूद्ध 2017 साली 208 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा याने मोहालीमध्ये ही कामगिरी केली होती. मात्र कर्णधार म्हणून वन डे मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये सेहवाग अजुनही एक नंबरला आहे.
219 वीरेंद्र सेहवाग विरुद्ध वेस्ट इंडिज, इंदूर 2011
208* रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, मोहाली 2017
189 सनथ जयसूर्या विरुद्ध भारत, शारजाह 2000
186* सचिन तेंडुलकर विरुद्ध न्यूझीलंड, हैदराबाद 1999
181 सर व्हिव्हियन रिचर्ड्स विरुद्ध श्रीलंका, कराची 1987
175* कपिल देव विरुद्ध झिम्बाब्वे, टुनब्रिज वेल्स 1983
टीम इंडियाने 2011 मध्ये वीरेंद्र सेहवाग याच्या नेतृत्त्वाखाली 3 कसोटी आणि 5 एकदिवसी मालिकेचा दौरा केला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2-0 ने जिंकली. यानंतर, एकदिवसीय मालिका खेळली गेली, ज्यातील पहिल्या 3 सामन्यांमध्ये भारताने 2-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र, तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. अशा स्थितीत चौथा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरला होता. एकदिवसीय मालिकेतील 4 सामन्यात सेहवाग कर्णधार होता.
दरम्यान, या सामन्यात वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी 176 धावांची सलामी दिली होती. या सामन्यात सेहवागने नाबाद 208 धावा करत द्विशतक करणारा जगातली दुसरा खेळाडू ठरला होता. वन डे क्रिकेटमध्ये पहिलं द्विशतक सचिन तेंडुलकर याने केलं होतं. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ग्वाल्हेर येथे सचिनने कारनामा केला होता. सेहवागने ठोकलेल्या द्विशतकाच्या सामन्यात भारताने वन डे क्रिकेटमध्ये 418-5 धावसंख्या उभारली होती. सेहवागच्या नावावर हा विक्रम अजूनही आहे.