मुंबई : वर्ल्ड कप 2023 सुरू झाला असून एकावर एक विक्रम रचताना दिसत आहेत. रोमांचक सामने होत असून प्रत्येक संघ सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत आहेत. वर्ल्ड कपमध्ये अनेक स्टार खेळाडूंच्या मागे दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. भारताचा सलामीवीर शुबमन गिल हा दुखापतीमुळे नाहीतर त्याच्यामागे आजारपण लागलं आहे. अशातच एका स्टार खेळाडूवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून याबाबत त्याने पोस्ट करत माहिती दिली आहे.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून वानिंदू हसरंगा आहे. हसरंगा याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली असून हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीवर ही सर्जरी करावी लागली. गेल्या अनेक दिवसांपासून तो या दुखापतीमुळे झगडत होता. आशिया कपसह वानिंदू वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेला मुकला आहे.
वानिंदू हसरंगा श्रीलंका संघाच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. वर्ल्ड कपमध्ये नक्कीच त्यांना त्याची उणीव भासत असणार आहे. आयपीएलमध्येही हरसंगाने आपली जादू दाखवून दिलीये. ऑल राऊंडर कामगिरीच्या जोरावर संघाला त्याने दबावाच्या परिस्थितीतून बाहेर काढलं आहे. आताच झालेल्या लंका प्रीमिअर लीगमध्ये वानिंदू हसरंगा याने प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब पटकावला होता. लंका प्रीमिअर लीगमध्ये १० सामन्यांमध्ये २७९ धावा केल्या होत्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश त्यासोबतच त्याने १९ विकेट्स घेतल्या होत्या.
Hi everyone,
I am happy to inform you that my surgery to repair the defect in my hamstring muscle/tendon was a success, thanks to the brilliant work of Prof. Fares Haddad and the amazing hospital staff.
I will see you soon.
WH49 😇🤞 pic.twitter.com/0HkaewRyG4
— Wanindu Hasaranga (@Wanindu49) October 10, 2023
दरम्यान, श्रीलंका संघाचा पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात पराभव झाला होता. श्रीलंका संघाने 300 पेक्षा जास्त धावा करूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यामध्ये लंकेच्या गोलंदाजांना पाकिस्तानच्या विकेट घेण्यात अपयश आलं. मोहम्मद रिझवान याच्या नाबाद १३१ धावा आणि अब्दुल्ला शफीक ११३ धावा यांच्या शतकांमुळे श्रीलंकेचा पराभव झाला.