IND vs NZ : पहिल्या कसोटी पराभवानंतर टीम इंडियात उलथापालथ, अचानक या खेळाडूला मिळालं संघात स्थान

| Updated on: Oct 20, 2024 | 6:36 PM

न्यूझीलंडने 36 वर्षानंतर टीम इंडियाला देशात पराभूत केलं आहे. तसेच तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. या पराभवानंतर टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित चुकलं आहे. असं असताना टीम इंडियाच्या ताफ्यात 3 वर्षानंतर स्टार खेळाडूची एन्ट्री झाली आहे.

IND vs NZ : पहिल्या कसोटी पराभवानंतर टीम इंडियात उलथापालथ, अचानक या खेळाडूला मिळालं संघात स्थान
Follow us on

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून टीका होत आहे. घरच्या मैदानावर इतक्या वाईट पद्धतीने पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ असावी. न्यूझीलंडने पहिल्या डावात 46 धावांवर टीम इंडियाला ऑलआऊट केलं. त्यानंतर दुसऱ्या डावात 8 गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाचे फलंदाज पहिल्या डावात फेल गेले. दुसरीकडे, गोलंदाजही काही खास करू शकले नाहीत. त्यामुळे टीम इंडियाच्या गोटात खळबळ उडाली आहे. असं असताना टीम इंडियाच्या ताफ्यात एका अष्टपैलू खेळाडूची एन्ट्री झाली आहे. टीम इंडियाने उर्वरित दोन कसोटी सामन्याासठी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याला टीम इंडियात सहभागी केलं आहे. वॉशिंग्टन सुंदरने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना 2021 मध्ये खेळला होता. त्यानंतर टीम इंडियात कमबॅकसाठी प्रतीक्षा करत होता. अखेर त्याला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. वॉशिंग्टन सुंदर टीम इंडियासठी 4 कसोटी खेळला असून सहा डावात त्याने तीन अर्धशतकं ठोकली आहे. तसेच 6 विकेट घेतल्या आहेत.

वॉशिंग्टन सुंदरला बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत संधी मिळाली होती. तसेच श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाच्या ताफ्यात होता. त्याने 22 वनडे आणि 52 टी20 सामने खेळले आहेत. देशांतर्गत रणजी ट्रॉफीत त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. रणजी स्पर्धेत एलीट ग्रुप डीमध्ये तामिळनाडू आणि दिल्ली या संघात होणाऱ्या सामन्यात खेळत आहे. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने जबरदस्त कामगिरी केली. पहिल्याच डावात दमदार शतक ठोकलं. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत 269 चेंडूत 152 धावा केल्या. यात 19 चौकार आणि 1 षटकार मारला. मागच्या सात वर्षातील वॉशिंग्टन सुंदरचं हे पहिलं फर्स्ट क्लास शतक आहे. तसेच दोन जणांना बादही केलं.

न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन कसोटीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि वॉशिंगटन सुंदर.