मुंबई : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने ग्रुप स्टेजमधील चौथ्या सामन्यामध्ये आयर्लंड संघाचा पराभव केला आहे. भारतीय संघासाठी ‘करो या मरो’ सामना होता. पावसामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार टीम इंडियाला 5 धावांनी विजयी घोषित केलं आहे. भारताने 155 धावा केल्या होत्या. यामध्ये स्टार खेळाडू स्मृती मंधानाने दमदार अर्धशतक करत 87 धावा केल्या होत्या. स्मृतीने 56 बॉलमध्ये 155.36 च्या कडक स्ट्राईक रेटने 9 चौकार आणि 3 गगनचुंबी सिक्सच्या मदतीने 87 धावांची धमाकेदार खेळी केली.
स्मृतीच्या या खेळीमुळे आयर्लंडला 150 पेक्षा अधिक धावांचं आव्हान देता आलं. स्मृतीने मारलेला एक सिक्सरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये स्मृतीन मिड विकेटला मारलेला सिक्सर आहे. मंधानाने 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. मंधानाने जमिनीवर गुडघे टेकत आणि डीप मिड-विकेटवर षटकार ठोकला. यासह मंधानाने आपले अर्धशतक पूर्ण केले.
स्मृतीने तिचाच आंतरराष्ट्रीय टी-20 मधील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. कारकिर्दीमधील तिने 22 वं अर्धशतक झळकवलं. शफाली वर्माने 24 आणि जेमिमाह रॉड्रिग्जने 19 धावांचे योगदान दिले. कर्णधार हरमनप्रीत कौरने 14 धावा केल्या. कौरने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 3 हजार धावा पूर्ण केल्या. आयर्लंडकडून लॉरा डेलानीने ३ बळी घेतले. ओरला प्रेंडरगास्टने 2 तर आर्लेन केलीने एक विकेट घेतली.
आयर्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन) | एमी हंटर, गॅबी लुईस, ओरला प्रेंडरगास्ट, एमियर रिचर्डसन, लुईस लिटिल, लॉरा डेलेनी (कर्णधार), आर्लेन केली, मेरी वॉल्ड्रॉन (कीपर), लेआ पॉल, कारा मरे आणि जॉर्जिना डेम्पसी.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन) | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), देविका वैद्य, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड आणि रेणुका ठाकूर सिंग.