यजमान वूमन्स ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर पहिल्या सामन्यात 5 विकेट्नसे विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 101 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला या विजयी धावांचा पाठलाग करताना ठराविक अंतराने झटके दिल्याने सामना काही वेळ रंगात आला होता. मात्र आव्हान फारच कमी असल्याने ऑस्ट्रेलियाने हा सामना सहज जिंकला. ऑस्ट्रेलियाने 16.2 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 102 गमावल्या. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत दुसरा सामना जिंकावा लागणार आहे.
ऑस्ट्रेलियासाठी फोबी लिचफील्ड आणि जॉर्जिया वॉल या सलामी जोडीने सर्वाधिक धावा केल्या. तर इतरांनी काही धावा करत विजयात योगदान दिलं. फोबी लिचफील्ड हीने 29 बॉलमध्ये 8 फोरसह 35 रन्स केल्या. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 4 झटके दिले. मात्र जॉर्जिया वॉल हीने चिवट खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. जॉर्जियाने 42 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 46 धावा केल्या. तर कॅप्टन ताहिला मॅकग्रा हीने नाबाद 4 धावा केल्या. टीम इंडियाकडून रेणुका सिंह ठाकुर हीने तिघांना बाद केलं. तर प्रिया मिश्रा हीने 2 विकेट्स मिळवल्या.
त्याआधी टॉस जिंकून टीम इंडियाने बॅटिंगचा निर्णय केला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गन शूट हीने 5 झटके देत टीम इंडियाला 34.2 ओव्हरमध्ये 100 धावांवर गुंडाळण्यात मोठी भूमिका बजवली. टीम इंडियासाठी जेमिमाह रॉड्रिग्स या एकटीलाच 20 पार पोहचता आलं. तर इतर फलंदाज फ्लॉप ठरले.
ऑस्ट्रेलियाची विजयी सुरुवात
A strong bowling performance helps Australia thump India to go 1-0 up in the Women’s ODI series 🔥
📝 #AUSvIND: https://t.co/va1FLK5kV8 pic.twitter.com/UmM1rVSuZL
— ICC (@ICC) December 5, 2024
वूमन्स ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : ताहलिया मॅकग्रा (कॅप्टन), फोबी लिचफील्ड, जॉर्जिया वॉल, एलिस पेरी, बेथ मूनी (विकेटकीपर), ॲनाबेल सदरलँड, ॲशले गार्डनर,जॉर्जिया वेरेहम, अलाना किंग, किम गर्थ आणि मेगन शूट.
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), प्रिया पुनिया, स्मृती मानधना, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, तीतास साधू, प्रिया मिश्रा, सायमा ठाकोर आणि रेणुका ठाकूर सिंग.