BANW vs INDW 3rd T20I | बांगलादेशचा तिसऱ्या सामन्यात 4 विकेट्सने विजय, टीम इंडियाने मालिका जिंकली

| Updated on: Jul 13, 2023 | 5:27 PM

BAN vs IND 3rd T20i | वूमन्स बांगलादेश क्रिकेट टीमने टीम इंडियावर 4 विकेट्सने विजय मिळवत लाज राखली आहे.

BANW vs INDW 3rd T20I | बांगलादेशचा तिसऱ्या सामन्यात 4 विकेट्सने विजय, टीम इंडियाने मालिका जिंकली
Follow us on

ढाका | बांगलादेश वूमन्स क्रिकेट टीमने टीम इंडियावर तिसऱ्या टी 20 सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. बांगलादेशने या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिले 2 सामने गमावले होते. त्यामुळे बांगलादेशने या मालिके 0-2 ने पिछाडीवर होती. यामुळे बांगलादेशला आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या सामन्यात विजय मिळवायचा होता. बांगलादेश या प्रयत्नात यशस्वी ठरली. बांगलादेशने या विजयासह मालिकेचा शेवट विजयाने केला. तसेच टीम इंडियाला क्लिन स्वीप देण्यापासून रोखलंही.

बांगलादेश क्रिकेट टीमचा 4 विकेट्सने विजय

बांगलादेशने 103 धावांचं आव्हान 10 चेंडूंआधी पूर्ण केलं. बांगलादेशने 18.2 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 103 धावा केल्या. बांगलादेशकडून शमीमा सुल्ताना हीने सर्वाधिक 42 धावा केल्या. तर निगर सुल्ताना 14, सुल्ताना खातून 12, शाथी राणी आणि नाहिदा अक्तर या दोघांनी प्रत्येकी 10 धावांचं योगदान दिलं. रितू मोनी हीने नॉट आऊट 7 रन्स केल्या. तर दोघींना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियाकडून मिन्नू मणी आणि देविका वैद्य या दोघींनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर जेमिमाह रॉड्रिग्जने 1 विकेट घेतली.

टीम इंडियाची बॅटिंग

त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या सलामी जोडीने निराशा केली. स्मृती मंधाना 1 आणि शफाली वर्मा 11 धावावंर आऊट झाली. जेमिमा रॉड्रिग्जस हीला चांगली सुरुवात मिळाली. मात्र तिला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. जेमिमाह 28 धावा करुन आऊट झाली.

दुसऱ्या सामन्यात झिरोवर आऊट झालेली कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने टीम इंडियाचा डाव सावरला. टीम इंडिया अडचणीत असल्याने हरमनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. हरमन उत्तम खेळत होती. मात्र हरमन 40 धावांवर आऊट झाली. त्यानंतर यास्तिका भाटीया हीने आपल्या खेळीचा द एन्ड केला. यास्तिका 12 धावांवर आऊट झाली. त्यामुळे टीम इंडियाचा 17.1 ओव्हरमध्ये 5 आऊट 93 असा स्कोअर झाला.

यानंतर टीम इंडियाने पुढील 4 विकेट्स या अवघ्या 9 धावांच्या मोबदल्यात गमावल्या. अमनज्योत कौर आणि पूजा वस्त्राकर या दोघींनी प्रत्येकी 2-2 धावा केल्या. तर दीप्ती शर्मा 4 आणि मिन्नू मणी 1 रनवर आऊट झाली. तर देविका वैद्य 1 धावेवर नाबाद राहिली. टीम इंडियाने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 9 बाद 102 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून रबिया खान हीने 3, सुल्ताना खातूनने 2, तर नाहिदा, फातिमा आणि शोमा या तिघींनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

टीम इंडियाने मालिका जिंकली

दरम्यान टीम इंडियाने ही 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर पहिल्या सामन्यात 7 तर दुसऱ्या मॅचमध्ये 8 धावांनी विजय मिळवला होता. आता उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आहे. या मालिकेला 16 जुलैपासून सुरुवात होणार आहे.

बांगलादेश प्लेइंग इलेव्हन | निगार सुलताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), शमीमा सुलताना, शथी राणी, दिलारा अक्‍टर, रितू मोनी, शोर्ना अक्‍टर, नाहिदा अक्‍टर, राबेया खान, सुलताना खातून, फहिमा खातून आणि मारुफा अक्‍टर.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकार, मिन्नू मणी आणि राशी कनोजिया.