वर्ल्ड चॅम्पियनशीप लीग 2024 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेतील सहभागी 6 पैकी 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. इंडिया चॅम्पियनने दक्षिण आफ्रिका चॅम्पियनचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दोन्ही सामने हे आज 12 जुलै रोजी पार पडणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्याआधी कट्टर प्रतिस्पर्धी टीम इंडिया-पाकिस्तान हे पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची समीकरणं जुळून येत आहेत. इंडिया-पाकिस्तान दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहचले आहेत. त्यामुळे आता हे दोन्ही संघ फायनलमध्ये पोहचणार की नाहीत? हे पुढील काही तासांतच स्पष्ट होईल.
डब्ल्यूसीएल स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तान चॅम्पियन विरुद्ध वेस्ट इंडि चॅम्पियन भिडणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे नॉर्थम्पटन, काउंटी ग्राउंड, येथे करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 5 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्यानंतर रात्री 9 वाजता ऑस्ट्रेलिया चॅम्पियन विरुद्ध टीम इंडिया यांच्यात महामुकाबला होणार आहे. युवराज सिंह इंडिया चॅम्पियनचं नेतृत्व करणार आहे. तर ब्रेट ली याच्याकडे ऑस्ट्रेलिया चॅम्पियनची धुरा आहे.
आता इंडिया-पाकिस्तान असा अंतिम फेरीत सामना होण्यासाठी दोन्ही संघांना उपांत्य फेरीतील सामना जिंकावा लागणार, हे स्पष्ट आहे. दोन्ही संघांपैकी एकही संघ पराभूत झाला, तर क्रिकेट चाहत्यांना महामुकाबल्याला मुकावं लागू शकतं. त्यामुळे दोन्ही संघ उपांत्य फेरीत जिंकावेत आणि इंडिया-पाकिस्तान असा हायव्होल्टेज सामना व्हावा, अशी इच्छा प्रत्येक क्रिकेट चाहत्याची आहे. आता काय होतं, हे येत्या काही तासातच स्पष्ट होईल. या स्पर्धेतील अंतिम सामना हा शनिवारी 13 जुलै रोजी होणार आहे.
पाकिस्तान चॅम्पियन्स : यूनुस खान (कॅप्टन), मिस्बाह उल हक, शाहिद अफ्रिदी, कामरान अकमल, अब्दुल रझ्झाक, वाहेब रियाझ, सईद अजमल, सोहेल तन्वीर, सोहेल खान, तन्वीर अहमद, मुहम्मद हफीझ , आमीर खान, शोएब मलिक, शोएब मकसूद, शार्जिल खान आणि उमर खान
इंडिया चॅम्पियन्स टीम: युवराज सिंह (कॅप्टन), हरभजन सिंह, सुरेश रैना, इरफान पठान, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, यूसुफ पठान, गुरकीरत मान, राहुल शर्मा, नमन ओझा, राहुल शुक्ला, आरपी सिंह, विनय कुमार, धवल कुलकर्णी, अनुरीत सिंह आणि पवन नेगी.