बारबाडोस | वूमन्स कॅरिबेयन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला 31 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत एकूण 3 संघांमध्ये 6 सामने पार पडणार आहेत. या स्पर्धेत भारताची युवा 21 वर्षीय खेळाडू श्रेयांका पाटील ही देखील सहभागी झाली आहे. श्रेयांका या स्पर्धेत खेळणारी पहिलीच भारतीय ठरली आहे. श्रेयांका या स्पर्धेत गयाना अॅमेझॉन वॉरियर्स टीमकडून खेळतेय. श्रेयांकाने याआधी भारतात पार पडलेल्या एमर्जिंग आशिया कपमध्ये आपली छाप सोडली. आता श्रेयांकाने तशीच कामगिरी सीपीएलमध्ये करुन भारताचं नावं उंचावलं आहे.
या स्पर्धेतील चौथा सामना हा मंगळवारी 5 सप्टेंबर रोजी पार पडला. गयाना अॅमेझॉन वॉरियर्स विरुद्ध त्रिनबागो नाईट रायडर्स हे आमनेसामने होते. हा सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये पार पडला. गयाना अॅमेझॉन वॉरियर्स टीमने हा सामना 21 धावांनी जिंकला. श्रेयांका पाटील हीने या सामन्यात शानदार कामगिरी केली. श्रेयांकाने 4 ओव्हरमध्ये 15 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. श्रेयांकाने या दरम्यान जादूई बॉल टाकला.श्रेयांकाने टाकलेला बॉल कॅरेबियन बॅट्समनला समजलाच नाही आणि ती क्लिन बोल्ड झाली. श्रेयांकाने टाकलेल्या या जादूई बॉलचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
श्रेयांकाने त्रिनबागोच्या डावातील 16 वी ओव्हर टाकली. श्रेयांकाने या ओव्हर दरम्यान त्रिनबागोच्या ब्रिटनी कूपर हीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवत क्लिन बोल्ड केलं. श्रेयांकाने ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकला. बॉलने टप्पा घेतला. बॉल टर्न झाला आणि थेट मिडल स्टंपवर जाऊन लागला. बॉल कधी नजरेसमोरून स्टंपला लागला बॅट्समनला समजलंच नाही. क्लिन बोल्ड झाल्यानंतर ब्रिटनी हैराण झाली.
श्रेयांकाने टाकलेला मॅजिकल बॉल
What a cracker of a delivery by Shreyanka Patil. pic.twitter.com/EpfVMHIp8c
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 6, 2023
दरम्यान श्रेयांकाने कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या या मोसमात आतापर्यंत 3 सामन्यात सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या आहेत. श्रेयांकाला 31 ऑगस्टला पहिल्या सामन्यात बारबाडोस रॉयल्स विरुद्ध एकही विकेट मिळाली नाही. मात्र त्यानंतर दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक केलं. श्रेयांकाने 3 सप्टेंबरला बारबाडोस रॉयल्स विरुद्ध तब्बल 4 विकेट्स घेतल्या. श्रेयांकाने त्या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 34 धावा देत या विकेट्स घेतल्या.
गयाना अॅमेझॉन वॉरियर्स प्लेईंग ईलेव्हन | स्टॅफनी टेलर (कर्णधार) सोफी डेव्हाईन, सुझी बेट्स, शेमाइन कॅम्पबेल (विकेटकीपर), नताशा मॅक्लीन, शबिका गजनबी, श्रेयांका पाटील, शेनेता ग्रिमंड, करिश्मा रामहारक, शबनीम इस्माईल आणि शकेरा सेलमन.
त्रिनबागो नाइट रायडर्स वूमन्स प्लेईंग ईलेव्हन | डिआंड्रा डॉटिन (कॅप्टन), मेरी केली, ली-अॅन किर्बी, किसिया नाइट (विकेटकीपर), मिग्नॉन डू प्रीझ, किशोना नाइट, ब्रिटनी कूपर, झैदा जेम्स, अनीसा मोहम्मद, शमिलिया कोनेल आणि फ्रॅन जोनास.