बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील अॅडलेडमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसर्या पिंक बॉल टेस्ट मॅचचा निकाल तिसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रातच लागला. ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात टीम इंडियाचा 10 विकेट्सने खुर्दा उडवला. ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीनेच विजयासाठी मिळालेलं 19 धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने या विजयासह पर्थमधील पराभवाचा वचपा घेत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाचा हा पिंक बॉल टेस्टमधील एकूण 13 पैकी 12 वा विजय ठरला. तसेच ऑस्ट्रेलियाने अॅडलेडमध्ये पिंक बॉलने आपला दबदबा कायम ठेवला. ऑस्ट्रेलियाने अॅडलेडमध्ये पिंक बॉलने खेळलेले सर्व सामने जिंकलेत. ऑस्ट्रेलियाचा हा अॅडलेडमधील आठवा विजय ठरला. या लाजिरनवाण्या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने काय म्हटलं? जाणून घेऊयात.
“आमच्यासाठी हा आठवडा फार निराशाजनक राहिला.आम्ही जिंकायच्या लायकीचं (तोडीचं) खेळू शकलो नाहीत. ऑस्ट्रेलिया आमच्यापेक्षा चांगला खेळला. सामन्यात आम्हाला कमबॅक करण्याची संधी होती. मात्र आम्ही त्या संधीचा फायदा घेऊ शकलो नाहीत. आम्ही त्या संधीचा फायदा घेण्यात अपयशी ठरलो आणि त्याची किंमत आम्हाला मोजवी लागली. आम्ही पर्थमध्ये जे केले ते खूप खास होतं. अॅडलेडमध्येही आम्हाला पर्थसारखीच कामगिरी करायची होती. मात्र प्रत्येक कसोटी सामन्यात आव्हान वेगवेगळं असतं. पिंक बॉलमुळे आव्हानात्मक असेल हे आम्हाला माहीत होतं”,असं रोहितने पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान म्हटलं.
कॅप्टन रोहितला पराभव जिव्हारी
Rohit Sharma said “We didn’t bat well, they batted well – That was the difference”. pic.twitter.com/8pHl7i2IJl
— Johns. (@CricCrazyJohns) December 8, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.