IND vs BAN : पाकिस्तानचा सूपडा साफ केल्यानंतर बांगलादेश कॅप्टनचा टीम इंडियाला इशारा, म्हणाला…

| Updated on: Sep 03, 2024 | 7:13 PM

Najmul Hossain Shanto On Team India : पाकिस्तानला कसोटी मालिकेत नमवल्याने बांगलादेशचा आत्मविश्वास जास्तच वाढला आहे. बांगलादेशच्या कॅप्टन नजमुल हुसैन शांतो याने टीम इंडियाला आगामी मालिकेच्या पार्श्वभूमीवर इशारा दिला आहे.

IND vs BAN : पाकिस्तानचा सूपडा साफ केल्यानंतर बांगलादेश कॅप्टनचा टीम इंडियाला इशारा, म्हणाला...
Najmul Hossain Shanto
Image Credit source: bangladesh cricket x account
Follow us on

बांगलादेशने पाकिस्तानवर दुसऱ्या कसोटी सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. बांगलादेशने विजयासाठी मिळालेलं 185 धावांचं आव्हान हे 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. बांगलादेशने यासह इतिहास रचला. बांगलादेशने पाकिस्तानला व्हाईट वॉश देत ही मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. बांगलादेशची पाकिस्तानात मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. बांगलादेशने नजमुल हुसैन शांतो याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. आता बांगलादेश पुढील कसोटी मालिकेत टीम इंडिया विरुद्ध खेळणार आहे. या मालिकेआधी नजमुल हुसैन शांतोने टीम इंडियाला इशारा दिला आहे.

नजमुल शांतो काय म्हणाला?

शांतोने पाकिस्तान विरूद्धच्या मालिका विजयाचा आनंद व्यक्त केला. शांतोने या मालिकेबाबत प्रतिक्रिया दिली. “तसेच आगामी टीम इंडिया विरूद्धच्या टेस्ट सीरिजबाबतही प्रतिक्रिया दिली. “मालिका विजयाचं आनंद शब्दात व्यक्त करु शकत नाही. खूपच आनंद झालाय”, असं नजमुल शांतो म्हणाला. तसेच “आमच्यासाठी पुढची मालिका खूप महत्त्वाची आहे. या विजयामुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळालाय. आमच्याकडे मुशी (मुशफिकुर रहीम) आणि शाकिब (शाकिब अल हसन) असे अनुभवी खेळाडू आहेत. हे दोघे ही भारतात महत्त्वाचे ठरतील”, असा विश्वास व्यक्त करत शांतोने टीम इंडियाला अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.

बांगलादेशचा भारत दौरा

दरम्यान बांगलादेश आता पाकिस्ताननंतर भारत दौऱ्यावर येणार आहे. बांगलादेश टीम इंडिया विरुद्ध 2 सामने खेळणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा 19 सप्टेंबरला होणार आहे. तर दुसरा सामना हा 27 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना हा चेन्नई तर दुसरा सामना कानपूर येथे होणार आहे. त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांची टी 20i मालिका होणार आहे.

टीम इंडियाला इशारा

हेड टु हेड रेकॉर्ड्स

आतापर्यंत टीम इंडिया-बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 13 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने त्यापैकी 11 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 2 सामने ड्रॉ राहिले आहेत. बांगलादेशला अद्याप टीम इंडिया विरुद्ध एकदाही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. उभयसंघात 2022 साली अखेरची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. तेव्हा भारताने बांगलादेशला 2-0 ने पराभूत केलं होतं.