Team India: “या वर्षी भारताला आणि चाहत्यांना….” कॅप्टनची हर’मन’ जिंकणारी प्रतिक्रिया

| Updated on: Aug 28, 2024 | 7:52 PM

Womens T20i World Cup 2024 : वूमन्स टीम इंडियाला आतापर्यंत अनेकदा आयसीसी ट्रॉफीने हुलकावणी दिली आहे. मात्र आता टीम इंडिया सज्ज झाली आहे. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने मन जिंकणारं उत्तर दिलं आहे.

Team India: या वर्षी भारताला आणि चाहत्यांना.... कॅप्टनची हरमन जिंकणारी प्रतिक्रिया
Harmanpreet Kaur Womens T20i World cup 2024
Image Credit source: icc
Follow us on

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. टीम इंडियाने यासह 13 वर्षांची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा संपवली. आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना वूमन्स टीम इंडियाकडून रोहितसेनेसारखीच कामगिरी अपेक्षित आहे. ऑक्टोबर 2024 पासून वूमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं आहे. वूमन्स टीम इंडियाला अद्याप एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे महिला ब्रिगेडचं यंदा भारताला पहिलीवहिली आयसीसी ट्रॉफी जिंकून देण्याचा प्रयत्न असणार आहे.

या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. त्यानुसार 10 संघांना 5-5 प्रमाणे 2 गटात विभागण्यात आलं आहे. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत 4 सामने खेळणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची 27 ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर स्मृती मनधानाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हरमनने या स्पर्धेआधी एका कार्यक्रमात वर्ल्ड कपबाबत प्रतिक्रिया दिली.

हरमनप्रीतने काय म्हटलं?

“आमचंही तेच लक्ष्य आहे. मेन्स टीमने कठोर मेहनत केली आणि त्यांचा फायदा मिळाला. आमचा मायदेशात पहिली ट्रॉफी घेऊन येण्याचा प्रयत्न असणार आहे. मेन्स टीमने ज्याप्रकारे अवघड सामन्यांमध्ये विजय मिळवला, तसंच आम्हीही खेळण्याचा प्रयत्न करु. टीम तयारी करत आहे. या वर्षी भारताला आणि चाहत्यांना पुन्हा एकदा जल्लोष करण्याची संधी देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे”, अस हरमनने म्हटलं.

दरम्यान महिला ब्रिगेडला अनेकदा आयसीसी ट्रॉफीने हुलकावणी दिली आहे. टीम इंडियाला 2017 साली वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडने पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने 2023 मध्ये टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये पराभूत केलं होतं.

कॅप्टनने हर’मन’ जिंकलं

टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृति मनधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर)*, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील* आणि सजना सजीवन.