क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टी 20 क्रिकेट इतिहासातील यशस्वी ऑलराउंडरपैकी एक आणि महेंद्रसिंह धोनी याचा विश्वासू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने सर्वात छोट्या फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ब्राव्होची कॅरेबियन प्रीमियर लीग 2024 ही अखेरची स्पर्धेा असणार आहे. ब्राव्होने याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलला रामराम केला आहे. मात्र त्यानंतरही ब्राव्हो सीपीएल अर्थात कॅरेबियन प्रीमिय लीग स्पर्धेत तो खेळत होता. मात्र आता या हंगामानंतर ब्राव्हो खेळताना दिसणार नाही. ब्राव्होने निवृत्तीबाबतची माहिती सोशल मीडिया पोस्टवरुन दिली आहे.
ब्राव्होने ट्रिनबागो नाईट रायडर्सच्या पहिल्या सामन्याआधी ही घोषणा केली. ब्राव्हो निवृत्तीबाबत सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त झाला. “हा एक अप्रतिम प्रवास राहिला. हा माझा शेवटचा हंगाम असणार आहे. मी कॅरेबियन चाहत्यांसमोर अखेरची व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी उत्सुक आहे”, असं ब्राव्होने या पोस्टमध्ये म्हटलंय. ब्राव्होच्या नावावर सध्या सीपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. ब्राव्होने 103 सामन्यांमध्ये 22.40 च्या सरासरी आणि 8.69 च्या इकॉनॉमी रेटने 128 विकेट्स घेतल्यात. ब्राव्होने याआधी 2021 साली आंतरराष्ट्रीय तर 2023 साली आयपीएलमधू निवृत्ती घेतली. ब्राव्हो आयपीएलमध्ये निवृ्त्तीनंतर आता कोच म्हणून जबाबदारी सांभाळतोय करतोय.
सीपीएल स्पर्धेच्या इतिहासात ब्राव्हो एकूण 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या विजयी संघाचा सदस्य राहिलाय. त्यापैकी 3 वेळा टीकेआर संघाने सीपीएलची ट्रॉफी उंचावलीय. आता ब्राव्होला सीपीएल विजयासह निरोप देण्याचा प्रयत्न इतर सहकाऱ्यांचा असणार आहे.
ड्वेन ब्राव्होची निवृत्तीची घोषणा
दरम्यान ड्वेन ब्राव्हो याच्या नावावर टी20 क्रिकेट इतिहासात सर्वाधिक 630 विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. ब्राव्हो व्यतिरिक्त अफगाणिस्तानच्या राशिद खान यालाच 613 विकेट्स घेण्यात यश आलं आहे. राशिदला ब्राव्होचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. राशिदला त्यासाठी आणखी 38 विकेट्सची गरज आहे.
दरम्यान ड्वेन ब्राव्होने 40 कसोटी, 164 एकदिवसीय आणि 91 टी20I सामन्यांमध्ये विंडिजचं प्रतिनिधित्व केलंय. ब्राव्होने या तिन्ही प्रकारात अनुक्रमे 2200, 2968 आणि 66 अशा धावा केल्या. तसेच ब्राव्होने टेस्ट, वनडे आणि टी20I क्रिकेटमध्ये 86, 199 आणि 78 विकेट्सही घेतल्यात.