मुंबई : वर्ल्ड कप 2023 सुरू असून भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी दोन सेमी फायनलमध्ये आपली जागा मिळवली आहे. आता तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी चढाओढ असलेली पाहायला मिळणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघ तिसरी संघ ठरण्याचे जास्त संकेत आहेत. त्यामुळ चौथा स्थानासाठी न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात चुरस आहे. साखळी फेरी शेवटाकडे आलेली असताना क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली असून स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणी केली आहे.
हा चॅम्पियन खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून सुनील नरेन आहे. नरेन याने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा होत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत नरेन याने आपल्या निवृत्तीची घोषणा केलीये. आपल्या मॅजिकल स्पेलने अनेकवेळा सामने फिरवाऱ्या नरेन याने आपल्या देशासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना चार वर्षांपूर्वी खेळला होता.
“मी वेस्ट इंडिज संघाकडून शेवटचा सामना खेळून चार वर्षे झाली आहेत. आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. ज्यांनी मला माझ्या कारकिर्दीमध्ये पाठिंबा दिला आणि माझं वेस्ट इंडिजसाठी खेळण्याचं स्वप्न साकार करायला मदत केली त्यांचे मनापासून आभार”
दरम्यान, सुनील नरेन याने 2011 साली वेस्ट इंडिज संघाकडून पदार्पण केलं होतं. वेस्ट इंडिजच्या सर्व क्रिकेटमध्ये त्याने प्रतिनिधित्त्व केलं आहे. सुनील याने 6 कसोटी, 65 वन डे आणि 51 टी-20 सामने खेळले असून एकूण 165 विकेट घेतल्या आहेत. सुनीलचे ही आकडेवारी फार काही प्रभवाी नसली तरी त्याने टी-२० लीगमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगभर प्रसिद्ध असलेल्या आयपीएलमध्ये कोलकाता संघाकडून प्रतिनिधित्त्व करणाऱ्या नरेनने 165 विकेट घेतल्या आहेत.