WTC Points Table: दक्षिण आफ्रिकेच्या विजयासह पॉइंट्स टेबलची स्थिती काय? टीम इंडिया कुठे?

| Updated on: Aug 18, 2024 | 5:15 PM

West Indies vs South Africa Wtc Points Table: दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर पाकिस्तानला मोठा झटका लागला आहे. तर टीम इंडिया कितव्या स्थानी आहे? जाणून घ्या.

WTC Points Table: दक्षिण आफ्रिकेच्या विजयासह पॉइंट्स टेबलची स्थिती काय? टीम इंडिया कुठे?
keshav maharaj and temba bavuma
Image Credit source: Icc X account
Follow us on

दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजवर कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात 40 धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे पाकिस्तानला मोठा झटका लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह टॉप 5 मध्ये धडक मारली आहे. तर पाकिस्तानची पहिल्या पाचातून घसरण झाली आहे. विंडिज-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पॉइंट्स टेबलमध्ये कोणती टीम कुठे आहे? हे जाणून घेऊयात.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळीतील अंतिम सामना हा 2025 साली खेळवण्यात येणार आहे. अंतिम सामना हा अव्वल 2 संघांमध्ये होणार आहे. टीम इंडिया सध्या अव्वल स्थानी विराजमान आहे. तर दक्षिण आफ्रिकेला विंडिज विरूद्धच्या मालिका विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये 2 स्थानांचा फायदा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिका त्याआधी सातव्या स्थानी होती. तर पाकिस्तानची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानला अजूनही संधी

दरम्यान पाकिस्तानला या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पॉइंट्स टेबलमध्ये पुढे जाण्याची संधी आहे. पाकिस्तान मायदेशात बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. पाकिस्तानला 21 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या 2 सामन्यांची कसोटी मालिका जिंकून पुढे जाण्याची संधी आहे. बांगलादेशला अद्याप पाकिस्तान विरुद्ध एकदाही कसोटी सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकल्यास त्यांना पुन्हा एकदा चांगल्या स्थितीत येण्याची संधी आहे.

पाकिस्तानला पछाडत दक्षिण आफ्रिकेची पाचव्या स्थानी झेप

वेस्ट इंडीज प्लेइंग ईलेव्हन : क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकाईल लुईस, केसी कार्टी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), गुडाकेश मोटी, जोमेल वॉरिकन, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, केशव महाराज, डेन पिएड, कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गर.