कधीकाळी हॉटेल रिसेप्शनिस्ट असलेली विनोद कांबळीची पहिली पत्नी आता काय करते? घर चालवण्यासाठी करते हे काम

| Updated on: Jan 12, 2025 | 6:14 PM

पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर विनोद कांबळीने त्या काळात प्रसिद्ध मॉडेल असलेल्या एंड्रिया हेविट सोबत दुसरं लग्न केलं. त्यांची पहिली पत्नी देखील चांगलीच चर्चेत राहिली आहे.

कधीकाळी हॉटेल रिसेप्शनिस्ट असलेली विनोद कांबळीची पहिली पत्नी आता काय करते? घर चालवण्यासाठी करते हे काम
Follow us on

तब्येत बिघडल्यानं माजी क्रिकेटर विनोद कांबळी हॉस्पिटलमध्ये अॅडमीट झाला होता. मात्र आता प्रकृतीत सुधारणा झाल्यानं त्याला डिस्चार्ज मिळाला आहे.त्याच्याकाळातील विस्फोटक फलंदाज अशी त्याची ओळख होती.मात्र त्याचं आयुष्य कायमच वादग्रस्त राहिलं,तो सतत याना त्या कारणांमुळे चर्चेत राहिला.विनोद कांबळीचं पहिलं लग्न हे पु्ण्यातील हॉटेल ब्लू डायमंडमध्ये रिसेप्शनिस्ट असलेल्या नोएला लुईससोबत झालं होतं. 1998 साली त्यांनी लग्न केलं. मात्र त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. काही वर्षांमध्येच त्यांनी घटस्फोट घेतला. विनोद कांबळीला असलेलं दारूचं वेसन आणि त्याच्या अफेअर्सच्या चर्चेमुळे विनोद कांबळीचा घटस्फोट झाला.

पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर विनोद कांबळीने त्या काळात प्रसिद्ध मॉडेल असलेल्या एंड्रिया हेविट सोबत दुसरं लग्न केलं. 2000 मध्ये त्या दोघांची ओळख झाली, ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं, त्या दोघांनी 2006 मध्ये लग्न केलं.विनोद कांबळी सध्या खूप हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे, हॉस्पीटलच्या उपचारासाठी देखील त्याच्याकडे पैसे नाहीत, मात्र अशाही परिस्थितीमध्ये त्याची दुसरी पत्नी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. परंतु अनेकांना त्याच्या पहिल्या पत्नीबद्दल देखील जाणून घेण्याची इच्छा आहे.

काय करते विनोद कांबळीची पहिली पत्नी?

विनोद कांबळीची पहिली पत्नी नोएला लुईस सध्या पुण्यामध्येच राहाते.ती सध्या जेल मंत्रालय ( भारत सरकार) सोबत काम करते.ती पुणे ख्रिश्चन सेमेट्री सोसायटीसोबत देखील काम करत आहे.ती अनेक सार्वजनिक उपक्रमांमध्ये देखील आपलं योगदान देत आहे. तसेच ती ईव्हेंट मॅनेजमेंटचं देखील काम करते.

2023 मध्ये दुसऱ्या पत्नीने केले होते गंभीर आरोप

2023 फेब्रुवारी महिन्यात विनोद कांबळीच्या दुसऱ्या पत्नीनं त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याच्याविरोधात तीने पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. तीने विनोद कांबळीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती.विनोद कांबळीने मला तवा फेकून मारल्याचा आरोप तीने केला होता.या घटनेनंतर विनोद कांबळी हा चांगलाच चर्चेत आला. या घटनेला मीडियामधून देखील चांगलंच कव्हरेज मिळालं होतं.