वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना ड्रॉ झाल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर काय फरक पडला? असा प्रश्न समोर आला आहे. दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज सामन्यात पावसामुळे सामन्यात वारंवार खंड पडला. त्यामुळे सामना ड्रॉ होण्याची वेळ आली. यामुळे दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघाच्या विजयी टक्केवारी फरक पडला आहे. पण दोन्ही संघांची गुणतालिकेतील स्थिती जैसे थेच आहे. दुसरीकडे, गुणतालिकेत वरच्या दोन स्थानात काही उलथापालथ झाली का? याची उत्सुकता होती. नव्या गुणतालिकेनुसार भारतीय संघ पहिल्या, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावरच आहे. कारण वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका हे दोन्ही संघ सध्या तळाशी आहेत. भारताची विजयी टक्केवारी 68.51 इतकी असून 9 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. टीम इंडियाला दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. स्लो ओव्हर रेटसाठी टीम इंडियाला 2 गुणांचा फटका बसला आहे.
ऑस्ट्रेलिया आतापर्यंत 12 कसोटी सामने खेळली आहे. यात 8 सामन्यात विजय, तीन सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 62.50 टक्के इतकी आहे. भारतीय संघ तीन मालिका खेळणार आहे. यात एकूण 10 सामने खेळणार आहे. यात बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने, न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामने, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने आहेत. भारताने 10 पैकी 5 सामने जिंकले तर अंतिम सामन्यात स्थान निश्चित होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025च्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया भिडण्याची दाट शक्यता आहे. हा सामना इंग्लंड लॉर्ड्स मैदानात होईल. मागच्या पर्वात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाची धूळ चारली होती.
The latest #WTC25 table after West Indies and South Africa play out a draw in Trinidad 🏏
Full standings 👉 https://t.co/F3gyovqND7#WIvSA pic.twitter.com/YJbTv5f1hL
— ICC (@ICC) August 12, 2024
भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पहिला कसोटी सामन्यात 19 ते 23 सप्टेंबर रोजी असणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या कसोटी मालिकेवर खऱ्या अर्थाने भारताचं पुढचं गणित ठरणार आहे. भारताने बांगलादेशला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाइट वॉश दिला तर अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल सुर होईल. दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतून बांग्लादेश आणि वेस्ट इंडिजचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. तर न्यूझीलंड, श्रीलंका, पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे.