जय शाह यांच्या त्या वक्तव्याचा नेमका अर्थ तरी काय? टी20 वर्ल्डकपपूर्वी बीसीसीआयमध्ये खलबतं

| Updated on: Dec 10, 2023 | 7:26 PM

वनडे वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियामध्ये बरीच उलथापालथ दिसून येत आहे. टी20 वर्ल्डकप संघात कोण राहील जाईल याचा काही नेम नाही. असं असताना बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? असा प्रश्न पडला आहे.

जय शाह यांच्या त्या वक्तव्याचा नेमका अर्थ तरी काय? टी20 वर्ल्डकपपूर्वी बीसीसीआयमध्ये खलबतं
टी20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियात मोठी उलथापालथ! राहुल द्रविडनंतर जय शाह यांच्या वक्तव्याने संभ्रम
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप पराभवानंतर बरीच गणित बदलली आहे. पराभवाच्या दु:खाची झळ जशी कमी होत आहे. तसं हळूहळू काही ना काही बाहेर येत आहे. त्यामुळे टी२० वर्ल्डकप २०२४ पूर्वी बरंच काही बदललेलं असेल यात शंका नाही. राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवला आहे. पण नेमक किती काळासाठी याचा कुठेही उल्लेख नाही. त्यात राहुल द्रविडने कोणताही करार केला नसल्याचं सांगितलं आहे. आता जय शहा यांनीही दक्षिण अफ्रिका दौऱ्यानंतर काय ते ठरेल असं सांगितल्याने संभ्रम वाढला आहे. जून २०२४ मध्ये टी२० वर्ल्डकप वेस्ट इंडिज अमेरिकेत खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी टीम इंडिया ६ टी२० मालिका खेळणार आहे. त्यात दक्षिण अफ्रिका दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी२० मध्ये आराम दिला गेला आहे. अशी सर्व खलबतं सुरु असताना जय शाह यांच्या आणखी एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, जय शाह यांनी सांगितलं की, रोहित शर्मा टी२० वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही याबाबत आता कोणतंही आश्वासन देता येणार नाही. जय शाह यांच्या या वक्तव्याने कोट्यवधी क्रीडारसिकांचं मन दुखावलं आहे. जय शाह यांनी पुढे सांगितलं की,”आयपीएल आणि टी२० मालिकांच्या आधारावर हा निर्णय घेतला जाईल. आता स्पष्ट करण्याची काय गरज आहे?” जय शाह यांच्या वक्तव्याचा क्रीडातज्ज्ञ वेगळा अर्थ काढत आहेत. वर्ल्डकप संघात जागा मिळवण्यासाठी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे.

आयपीएल स्पर्धेत गेल्या तीन वर्षात रोहित शर्माने हवी तशी कामगिरी केलेली नाही. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील फॉर्म पाहता या आयपीएलमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. जर तसं झालं तर मात्र रोहित शर्माच्या खांद्यावरच टी२० वर्ल्डकपची धुरा येऊ शकते. त्यात हार्दिक पांड्याची दुखापत आयपीएलमध्ये बळावली तर मात्र त्याचं खेळणंही कठीण होईल. त्यामुळे आता टी२० वर्ल्डकपबाबत जे काही ठरेल ते आयपीएल २०२४ नंतर ठरेल असं म्हणायला हकरत नाही.