मुंबई : ज्याची भीती होती शेवटी तेच घडलं. बीसीसीआयनं (BCCI) आज अशी बातमी दिली की त्यामुळे आता टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय. तर क्रिकेटप्रेमींच्या आशा देखील धुळीस मिळाल्या आहेत. एकीकडे टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जवळ येत असताना टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज संघातून बाहेर गेल्याची माहिती आहे. त्यामुळे बीसीसीआयनं संध्याकाळी दिलेली ही माहिती अनेकांची निराशा करून केली आहे.
NEWS – Jasprit Bumrah ruled out of ICC Men’s T20 World Cup 2022.
More details here – https://t.co/H1Stfs3YuE #TeamIndia
— BCCI (@BCCI) October 3, 2022
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे अधिकृतपणे T20 विश्वचषक 2022 मधून बाहेर पडला आहे. यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा झाली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून पुनरागमन करणाऱ्या बुमराहची दक्षिण आफ्रिकेतील टी-20 मालिकेसाठीही निवड झाली होती, मात्र पहिल्या सामन्यात तो तंदुरुस्त नसल्यामुळे तो खेळू शकला नाही.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका निवेदनात सांगितलंय की, बुमराहला आयसीसी पुरुषांच्या टी-20 विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने सांगितलंय की बुमराह आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही.
BCCI लवकरच T20 विश्वचषकासाठी बुमराहच्या बदलीची घोषणा करणार आहे. 2022 च्या T20 विश्वचषकातून बाहेर पडणारा बुमराह हा भारताचा दुसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी अष्टपैलू रवींद्र जडेजा या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.