चहल कुठे आहे? धनश्री वर्माला असा प्रश्न विचारताच खरं काय ते उत्तर मिळालं Watch Video

| Updated on: Jan 09, 2025 | 9:01 PM

टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून वावड्या उठल्या आहेत. या दोघांचा लवकरच घटस्फोट होईल असंही सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे. असं असताना धनश्री वर्मा सोशल मीडियावर व्यक्त झाली होती. आता एका व्हायरल व्हिडीओत तिने चहलबाबत विचारलेल्या प्रश्नाला थेट उत्तर दिलं आहे.

चहल कुठे आहे? धनश्री वर्माला असा प्रश्न विचारताच खरं काय ते उत्तर मिळालं Watch Video
Follow us on

भारतीय क्रिकेट युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या नात्याबाबत रोज काहीना काही नवीन समोर येत असतं. तसं पाहिलं तर धनश्री वर्मा सोशल मीडियावर सक्रिय असते. मात्र या दोघांच्या नात्याबाबत इतक्या वावड्या उठत असूनही व्यक्त होत नसल्याने संशयाला वाव आहे. पण बऱ्याच दिवसानंतर धनश्री वर्माने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. पण या पोस्टमध्येही युझवेंद्र चहलसोबत असलेल्या नात्याचा कुठेच उल्लेख केला नाही. त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आलं. खरं तर या दोघांनी इंस्टाग्रावर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर या चर्चांना खऱ्या अर्थाने उधाण आलं होतं. आता सोशल मीडियावर धनश्री वर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात पॅपराजीने धनश्रीला थेट युझवेंद्र चहलबाबत प्रश्न विचारला. पॅपराजीने धनश्रीला विचारलं की, युजी भाई कुठे आहे? या प्रश्नाला कोणतीही बगल न देता धनश्रीने थेट उत्तर दिलं.

धनश्री वर्मा कुठेतरी जात असताना तिला पॅपराजीने हेरलं आणि व्हिडीओ तयार करत असताना युझवेंद्र चहलबाबत प्रश्न विचारला. यावेळी उत्तर देताना धनश्री वर्मा भेदरलेली दिसली. पण तिला काय सांगायचे ते सांगून टाकलं. पॅपराजीने विचारलं युजी भाई कुठे आहे? याचं उत्तर देताना धनश्री म्हणाली, युजी भाई खेळण्याच्या तयारीत व्यस्त आहे. असं उत्तर देऊन धनश्री तेथून निघून गेली. पण हा व्हिडीओ नेमका कधीचा याबाबत काही कळू शकलेलं नाही. हा व्हिडीओ जुनाही असू शकतो. मात्र आता व्हायरल होत आहे.

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची भेट लॉकडाऊन दरम्यान 2020 मध्ये झाली होती. सुरुवातीला मैत्री आणि नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. डिसेंबर 2020 मध्ये दोघंही लग्न बंधनात अडकले. नुकतीच त्यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र दोघांनीही लग्नाच्या वाढदिवशी पोस्ट केली नाही. उलट अनफॉलो केल्याने घटस्फोटांच्या चर्चांना बळ मिळालं आहे. अजूनही दोघांनीही याबाबत अधिकृत असं काही सांगितलेलं नाही. पण सुरु असलेल्या गोंधळात मौन बागळल्याने संशयाला आणखी फाटे फुटले आहेत हे देखील तितकंच खरं आहे.