मुंबई : दरवर्षी आयपीएल (IPL 2022) स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे (Purple Cap) क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. शुक्रवारी सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सने (RR) ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात संघाने चेन्नई सुपर किंग्जला (CSK) पाच विकेट्सने पराभूत करून गुणतालिकेत क्रमांक-2 गाठला. नाणेफेक जिंकल्यानंतर धोनीच्या CSK ने स्कोअरबोर्डवर 150 धावा केल्या होत्या. ज्याला प्रत्युत्तर म्हणून दोन चेंडूंपूर्वी लक्ष्य गाठले गेले. यशस्वी जैस्वाल (44 चेंडूत 59 धावा) यानंतर रविचंद्रन अश्विनने 23 चेंडूत नाबाद 40 धावा केल्या. रियान परागसोबत त्याची चांगलीच जम बसली. यासह चेन्नईने 14 सामन्यांतील 10व्या पराभवासह आपला प्रवास संपवला. यानंतर आयपीएलच्या पर्पल कॅपमध्ये काय बदल झालाय पाहुया…
पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे. त्याने सर्वाधिक 26 विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानी वानिंदू हसरंगा आहे. त्याने 24 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या स्थानी कगिसो रबाडा आहे. त्याने 22 विकेट घेतल्या आहेत. चौथ्या स्थानी उमरान मलिक आहे. त्याने देखील 21 विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. पाचव्या स्थानी कुलदीप यादव आहे. त्याने 20 विकेट घेतल्या आहेत.
गोलंदाज | विकेट | दिलेल्या धावा |
---|---|---|
युझवेंद्र चहल | 26 | 462 |
वानिंदू हसरंगा | 24 | 362 |
कागिसो रबाडा | 23 | 406 |
उमरान मलिक | 22 | 444 |
कुलदीप यादव | 21 | 419 |
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.
राजस्थानचा 14 सामन्यांतील हा नववा विजय आहे . संघाचे नाव लखनौ सुपर जायंट्सच्या 18 गुणांच्या बरोबरीचे आहे परंतु चांगल्या नेट रनरेटमुळे ते दुसऱ्या स्थानावर आहेत.
कालच्या सामन्यानंतर आयपीएलचा पॉईंट्स टेबल बघितल्यास राजस्थान रॉयल्सच्या विजयात आणखी एका सामन्याच्या विजयाची भर पडली आहे. पॉईट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स पहिल्या क्रमांकावर आहे. या संघाने एकूण 14 सामने खेळले आहेत. त्यापैकी 10 सामन्यात त्यांना विजय मिळालाय तर 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. दुसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्स आहे. या संघाने कालचा धरून एकूण 14 सामन्यांपैकी नऊ सामन्यात यश संपादन केलंय. तर पाच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय.