IPL 2022, Purple Cap : पर्पल कॅपच्या यादीत कोणता खेळाडू आघाडीवर? तुमचा आवडता खेळाडू नेमका कुठे? जाणून घ्या

| Updated on: May 13, 2022 | 7:53 AM

पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे. त्याने सर्वाधिक 23 विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत.

IPL 2022, Purple Cap : पर्पल कॅपच्या यादीत कोणता खेळाडू आघाडीवर? तुमचा आवडता खेळाडू नेमका कुठे? जाणून घ्या
पर्पल कॅपमध्ये तिसऱ्या स्थानी कुलपदीप यादव
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : दरवर्षी आयपीएल (IPL 2022) स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे (Purple Cap) क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये काल 59 व्या सामन्यात पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सनं (MI) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जला 16 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 97 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने 14.5 षटकांत 5 बाद 103 धावा करून सामना जिंकला. प्लेऑफमध्ये पोहोचणारा गुजरात पहिला संघ ठरला तर मुंबई इंडियन्स हा या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरलाय. कालच्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय पाहुया…

पर्पल कॅपचा मानकरी कोण?

पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे. त्याने सर्वाधिक 23 विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानी वानिंदू हसरंगा आहे. त्याने 21 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या स्थानी कुलपदीप यादव आहे. त्याने अठरा विकेट घेतल्या आहेत. चौथ्या स्थानी कागिसो रबाडा आहे. त्याने देखील अठरा विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. पाचव्या स्थानी टी नटराजन आहे. त्याने सतरा विकेट घेतल्या आहेत.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज

गोलंदाज विकेट दिलेल्या धावा
युझवेंद्र चहल26462
वानिंदू हसरंगा
24362
कागिसो रबाडा23406
उमरान मलिक
22444
कुलदीप यादव21419

कोणाला दिली जाते पर्पल कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

हे सुद्धा वाचा

गुणतालिकेत बदल नाही

मुंबईच्या या विजयाने चेन्नईच्या प्लेऑफमध्ये जाणऱ्या आशा भंगल्या आहेत. पण, यामुळे गुणतालिकेत कोणताही बदल झालेला नाही. गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. हार्दिक पांड्याचा कर्णधार असलेला हा संघ 12 सामन्यांत 9 पराभव आणि 3 विजयांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर लखनौ सुपर जायंट्स आहे. ज्यांच्या नावावर 16 गुण आहेत. राजस्थान 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्स 12 गुणांसह पाचव्या, सनरायझर्स हैदराबाद 10 गुणांसह सहाव्या, कोलकाता नाईट रायडर्स दहा गुणांसह सातव्या आणि पंजाब किंग्स अकरा गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे.