मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होत आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. पण गाफिल राहणं महागात पडू शकतं हे देखील तितकंच खरं आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकत अव्वल स्थान गाठलं आहे. त्यामुळे विजयीरथ तसाच कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. तर बांगलादेशचा संघ शाकिब अल हसनच्या नेतृत्वात मोठा उलटफेर करण्याचा हेतूने सामना खेळेल. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरेल? इथपासून कोणते खेळाडू चमकदार कामगिरी करतील याकडे लक्ष लागून आहे. या सामन्यात बेस्ट कामगिरी करू शकतील अशा 11 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.
पुण्यातील हे मैदान फलंदाजीला पुरक आहे. या मैदानावर आतापर्यंत 7 सामने खेळले गेले आहेत. यात पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 4 सामने जिंकला आहे. या मैदानावर 300 च्या पार धावसंख्या होऊ शकते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर प्रथम फलंदाजी स्वीकारणं पसंत केलं जाईल.
भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार ठरू शकतात. पण सामन्यात कधी काय होईल हे देखील सांगता येत नाही. त्यामुळे शाकिब अल हसन, महेदी हसन मिराज, कुलदीप यादव यांच्या कामगिरीकडेही लक्ष असेल. तर रवींद्र जडेजा, केएल राहुल, शुबमन गिल हे खेळाडू बजेट ठरू शकतात.
भारत संभाव्य प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर/मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
बांगलादेश संभाव्य प्लेइंग 11 : नजमुल हुसैन शान्तो, तौहीद हृदोय, तनजीद हसन, महेदी हसन मिराज, शाकिब अल हसन (कर्णधार), महमूदुल्लाह रियाद, लिटन दास, मुश्फिकुर रहीम (विकेटकीपर), मुस्तफिजुर रहमान, शोरिफुल इस्लाम, तस्कीन अहम