WPL लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू; कोण आहे काशवी गौतम? जाणून घ्या

| Updated on: Dec 09, 2023 | 7:02 PM

Kashvee Gautam Most Expensive Player WPL 2024 : वयाच्या अवघ्या 20 वर्षी दोन कोटींची बोली लागणं म्हणजे खायची गोष्ट नाही. कारण वुमन्स प्रीमियरच्या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरलेलली काशवी गौतम चर्चेत आली आहे. कोण आहे काशवी गौतम, तिला इतकी मोठी बोली का लागली जाणून घ्या.

WPL लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू; कोण आहे काशवी गौतम? जाणून घ्या
Follow us on

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग2024  मिनी लिलावामध्ये भारतीय अनकॅप खेळाडू सर्वात महागडी खेळाडू ठरली. (WPL Auction 2024 Most Expensive Player) एकटी पोरगी सर्व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या खेळाडूंवर भारी पडली. सर्वात महागडी ठरलेल्या खेळाडूचं नाव काशवी गौतम असं आहे. काशवी गौतमची बेस प्राईज ही 10 लाख होती, लिलावामध्ये काशवीला तिच्य बेस प्राईजपेक्षा 20 पटीने जास्त पैसै लागले. गुजरात जायंट्सने काशवीला 2 कोटी रूपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात सामील करून घेतलंय. काशवी गौतम कोण आहे? तिने याआधी कशा प्रकारे प्रदर्शन केलंय? ती मुळची कुठली आहे? सर्व माहि ती जाणून घ्या.

कोण आहे काशवी गौतम?

20 वर्षीय काशवी गौतम ही पंजाबमधील चंदीगडची आहे. राईट आर्म फास्टर आहे. काशवी हिला तिच्या मावशीने क्रिकेट खेळायला सांगतिलं होतं. वयाच्या 6 व्या वर्षापासून खेळायची गल्लीतल्या मुलांसोबत क्रिकेट खेळू लागली. 2020 मध्ये बीसीआय महिला अंडर 19 स्पर्धेमध्ये अरूणाचल प्रदेशविरूद्ध दहा विकेट घेतल्या होत्या. त्यावेळी काशवी चांगलीच फेमस झाली होती. कारण अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली होती.

या वर्षी, गौतमने बीसीसीआय सीनिअर महिला T20 ट्रॉफीमध्ये चंदीगडसाठी 12 बळी घेतले आणि एकूण 112 धावा केल्या. बांगलादेशमध्ये खेळल्या गेलेल्या ACC इमर्जिंग वुमेन्स आशिया कपसाठी ही काशवी भारतीय महिला संघाचा एक भाग होती. मात्र गौतमला या स्पर्धेत फक्त दोनच सामने खेळण्याची संधी मिळाली. पावसामुळे बहुतेक सामने रद्द झाले होते.

दरम्यान, काशवीला २ कोटी रूपयांची बोली लागल्यावर तिचे आई-वडील भावूक झालेले पाहायला मिळाले. काशवीने जी काही मेहनत घेतली त्याचं तिला फळ मिळालं आहे. काशवीला टीम इंडियाकडून खेळताना पाहायचं स्वप्न असल्याचं सांगितलं.