IND vs AUS : पाचव्या टी20 सामन्यात कोण ठरेल बेस्ट कर्णधार आणि उपकर्णधार? जाणून घ्या ड्रीम इलेव्हन

| Updated on: Dec 02, 2023 | 5:17 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना रविवारी होणार आहे. हा सामन्याची फक्त औपचारिकता असणार आहे. कारण भारताने मालिका 3-1 आधीच खिशात घातली आहे. असं असलं तरी कोणते खेळाडू बेस्ट ठरतील याबाबत खलबतं सुरु आहेत. चला जाणून घेऊयात याबाबत.

IND vs AUS : पाचव्या टी20 सामन्यात कोण ठरेल बेस्ट कर्णधार आणि उपकर्णधार? जाणून घ्या ड्रीम इलेव्हन
IND vs AUS : पाचव्या टी20 सामन्यात हे 11 खेळाडू फोडतील आर्थिक कोंडी! जाणून घ्या कोणची निवड ठरेल बेस्ट ते
Follow us on

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका भारताने खिशात घातली आहे. भारताने आतापर्यंत झालेल्या चार सामन्यात 3-1 ने आघाडी घेतली आणि मालिका आपल्या ताब्यात घेतली. त्यामुळे पाचवा टी20 सामना फक्त औपचारिकता असणार आहे. पण ऑस्ट्रेलियन संघ आपली अब्रू राखण्यासाठी शेवटच्या सामना जिंकण्यावर भर देईत यात शंका नाही. तर भारत पाचवा सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असेल. बंगळुरूत 3 डिसेंबरला हा सामना खेळला जाणार आहे. या मालिकेत दोन्ही संघांनी तरुण आणि नवोदित खेळाडूंना संधी दिली आहे. आगामी 2024 टी20 वर्ल्डकपच्या उद्देश्याने खेळाडूंची चाचपणी केली जात आहे. त्यामुळे टीम तयार करताना खेळाडूंबाबत आकलन करणं कठीण जात आहे. पण मागच्या चार सामन्यातील कामगिरी पाहून एक अंदाज बांधला जाऊ शकतो. चला जाणून घेऊयात स्वप्नपूर्ती करणाऱ्या खेळाडूंबाबत..

पिच रिपोर्ट

बंगळुरूचं एम चिन्नास्वामी स्टेडियममधील पिच फलंदाजीसाठी चांगलं आहे. या खेळपट्टीवर चेंडू आरामात बॅटवर येतो. त्यामुळे गोलंदाजांचा चांगलाच कस लागणार आहे. पण एखाद्या गोलंदाजाला चांगली लय सापडली तर मात्र काहीही होऊ शकतं. फिरकीपटूंना काही अंशी मदत होऊ शकते. मागच्या 20 सामन्यांचा विचार करता या मैदानावर 157 धावांपर्यंत मजल मारली गेली आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकण्याचे 70 टक्के संधी आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारली जाईल.

ड्रीम इलेव्हनमध्ये 5 फलंदाज आणि 4 गोलंदाजांना संधी देता येईल. विकेटकीपर म्हमऊन जितेश शर्मा किंवा मॅथ्यू हेड यांच्यापैकी एकाचा विचार करू शकता. अष्टपैलू म्हणून अक्षर पटेलला संधी देऊ शकता. पाचव्या टी20 सामन्यात ऋतुराज गायकवाड किंवा यशस्वी जयस्वालला कर्णधार करू शकता. तर रवि बिष्णोई आणि ट्रेव्हिस हेड यांचा उपकर्णधारपदासाठी विचार केला जाऊ शकतो. पण सरते शेवटी तुमच्या आकलनावर कोणला कर्णधार करायचं आणि कोणाला संघात घ्यायचं हे ठरवू शकता.

ड्रीम इलेव्हन 1 : मॅथ्यू वेड (विकेटकीपर )सूर्यकुमार यादव, ट्रेव्हिस हेड, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), यशस्वी जयसवाल, अक्षर पटेल, दीपक चाहर, जेसन बेहरेनडॉर्फ, ख्रिस ग्रीन, रवि बिश्नोई (उपकर्णधार).

ड्रीम इलेव्हन 2 : जितेश शर्मा (विकेटकीपर ), सूर्यकुमार यादव, ट्रेव्हिस हेड (उपकर्णधार), रिंकू सिंह, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल (कर्णधार), अक्षर पटेल, दीपक चाहर, जेसन बेहरनडॉर्फ, ख्रिस ग्रीन, मुकेश कुमार