नवी मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील 5 वा सामना 7 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स आमनेसामने भिडणार आहेत. या मॅचला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व मेग लॅनिंग आणि यूपी वॉरियर्सची कॅप्टन्सी एलिसा हीली करणार आहे.
या सामन्यानिमित्ताने 2 वर्ल्ड चॅम्पियन एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधार या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करतात. या दोघींनी काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियासाठी सलग तिसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली होती. मात्र आता या दोघी एकमेकांसमोर आहेत.
दोन्ही संघांनी मोसमातील आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. दिल्लीने आरसीबीवर 5 माचर्ला 60 धावांच्या फरकाने विजय मिळवला. तर यूपीनेही 5 तारखेलाच गुजरावर 3 विकेट्सने मात केली. यामुळे आता दिल्ली आणि यूपी दुसऱ्या विजयासाठी सज्ज झाले आहेत.
दोन्ही संघांकडे तोडीसतोड फलंदाज आहेत. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात 84 तर कॅप्टन लॅनिंगने 72 धावांची झंझावाती खेळी केली होती. तसेच तारा नॉरीस हीने 5 विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच गुजरात विरुद्धच्या सामन्यात मराठमोळ्या किरण नवगिरे आणि ग्रेस हॅरीस या दोघींनी अर्धशतकी खेळी केली होती. किरणने 53 धावा केल्या होत्या. तर हॅरीसने शेवटपर्यंत मैदानात नाबाद राहत यूपीला विजय मिळवून दिला होता. हॅरीसने या मॅचमध्ये नॉट आऊट 59 रन्स केल्या. तसेच यूपीच्या गोलंदाजांनीही या सामन्यात चांगली कामगिरी केली होती.
त्यामुळे दोन्ही संघ हे तोडीसतोड आहे. पण आता आजच्या सामन्यात कोण वरचढ ठरणार आहे सलग दुसऱ्यांदा कोण बाजी मारणार, हे पाहण्यात रंगत येणार आहे.
दिल्ली कॅपिट्ल्स टीम | मेग लॅनिंग (कॅप्टन), जेमिमाह रोड्रिग्स (उपकर्णधार), शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, मारिजॅन कप्प, तीतस साधु, एलिस कॅप्सी, तारा नॉरिस, लॉरा हॅरिस, जसिया अख्तर, मिन्नू मणि, तानिया भाटिया, पूनम यादव, जेस जोनासन, स्नेहा दीप्ती आणि अरुंधति रेड्डी.
यूपी वॉरियर्स | एलिसा हीली (कर्णधार), दीप्ति शर्मा, सोफी एकलेस्टन, ताहिला मॅक्ग्रा, देविका वैद्य, शबनम इस्माइल, ग्रेस हॅरिस, अंजली शर्वनी, राजेश्वरी गायकवाड, श्वेता सहरावत, किरन नवगिरे, लॉरेन बेल, पार्शवी चोपडा, एस यशसरी, लक्ष्मी यादव आणि सिमरन शेख.