मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 33 वा सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. श्रीलंकाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने दुसऱ्याच बॉलवर रोहित शर्माची विकेट गमावली. त्यानंतर शुबमन गिल आणि विराट कोहली या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी केली. या दरम्यान विराट आणि शुबमन या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक ठोकलं. त्यानंतर दोघांनी जोरदार फटकेबादी सुरु केली.
शुबमन गिल आणि विराट कोहली या दोघांना शतकाची संधी होती. मात्र शुबमन गिल याच्या पाठोपाठ विराट कोहली याचीही शतक करण्याची संधी हुकली. शुबमन गिल आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये आपलं पहिलंवहिलं शतक ठोकण्यापासून मुकला. शुबमन गिल याचं श्रीलंका विरुद्धचं शतक हे अवघ्या 8 धावांनी हुकलं. शुबमन गिल यासह पहिल्यांदा नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला. शुबमन गिल 92 धावांवर आऊट झाला. शुबमन गिल आऊट झाल्यानंतर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर हीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शुबमन गिल याने 92 बॉलमध्ये 11 चौकारांच्या मदतीने 92 धावांची खेळी केली. शुबमन 30 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर कॅच आऊट झाला. शुबमन आऊट झाल्यानंतर मैदानात एकच शांतता पसरली. साराने नाकावर हात धरला. तसेच त्यानंतर शुबमनला साऱ्या मैदानाने उभं राहून सलाम केलं. यावेळेस शुबमनसाठी साराही उभी राहिली.
शुबमन आऊट झाल्यानंतर सारा तेंडुलकरने काय केलं?
Sara Tendulkar reactions after Shubman Gill missed a century #INDvSLpic.twitter.com/dttEoMWv8o
— ͏ ͏ ͏ ͏ (@aqqu___) November 2, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
शुबमन आणि सारा
Appreciation from Sara Tendulkar is no less than a hundred. Well done Shubman Gill. #INDvsSL pic.twitter.com/VomSz1eLbh
— R A T N I S H (@LoyalSachinFan) November 2, 2023
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश थेक्षाना, कसुन रजिथा, दुष्मंथा चमीरा आणि दिलशान मदुशंका.