नवी दिल्ली : क्रिकेट (Cricket) असो वा कोणताही खेळ. वाद हा कुठेही होतोच. यावेळी काही खेळाडू असं काही बोलून टाकतात की ज्याच्या पुढे बातम्या होतात आणि त्या दृष्टीनं चर्चाही रंगते. असंच काहीसं मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याच्याबाबतीत झालंय. तुम्हाला पाकिस्तानचे पूर्व गोलंदाज सिकंदर बख्त (Sikander Bakht) हा माहितच असेल. तो नेहमी माध्यमांवर असतो, नेहमी चर्चेत असतो. त्यानं यंदाही एक गोष्ट सांगितलं आणि चर्चेला उधाण आलं.
पाकिस्तानचा माजी गोलंदाज सिकंदर बख्तनं एक मोठा खुलासा केल्यानं तो चर्चेत आला आहे. तो म्हणाला की मोहम्मद रिझवाननं म्हटलं होतंय की सरफराज अहमदचं तो कधीच पुनरागमन होऊ देणार नाही. तुम्हाला हे माहित नसेल तर आम्ही सांगतो की, सरफराज अहमद पाकिस्तानच्या संघाबाहेर जाणार असल्याचं बोललं गेलं. टी- 20 वर्ल्ड कप संघात त्याला संधी देण्यात आलेली नाही.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज सिकंदर बख्तनं जिओ सुपरशी बोलताना सांगितलं की, ‘सरफराज आता खेळू शकणार नाही. रिझवान म्हणाला की, मी सर्फराजला कधीही येऊ देणार नाही. कारण सर्फराज असताना त्यानं रिझवानला खेळू दिलं नाही. आता उलट होईल. मी हे ऐकलंय. कदाचित माझी चूक असेल.
मोहम्मद रिझवानचे आकडे बोलतात असं म्हणावं लागेल. सरफराजचे पुनरागमन खरोखरच अवघड आहे. मोहम्मद रिझवानने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 24 कसोटी सामन्यांमध्ये 41 पेक्षा जास्त सरासरीने 1232 धावा केल्या आहेत . रिझवानची टी-20 मध्ये फलंदाजीची सरासरी 51 पेक्षा जास्त आहे. त्याने 2000 हून अधिक धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे.