मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेत जेतेपद मिळवण्यासाठी सर्वच संघ जोरदार तयारी करत आहे. विशेष करून जेतेपद मिळवण्यासाठी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका प्रयत्नशील असेल. असं असताना या वर्ल्डकपसाठी भारतीय संघाला प्रमुख दावेदार मानलं जात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने तर अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या दोन संघांची नावंही घोषित केली आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना होईल असं भाकीत त्याने वर्तवलं आहे. दुसरीकडे, 2011 वर्ल्डकप जेतेपदाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. एक एक करून आपल्या भात्यातून सेहवाग मजेशीर किस्से काढत आहे. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला खांद्यावर उचलण्याचा किस्सा सांगितला आहे.
वनडे वर्ल्डकप जेतेपदानंतर रनमशिन विराट कोहली याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला खांद्यावर उचललं होतं. यामागे नेमकं काय घडलं ते विरेंद्र सेहवाग याने सांगितलं. “आम्ही सचिन तेंडुलकरला खांद्यावर उचलण्यास नकार दिला होता. आम्ही खूपच म्हातारे होतो असं म्हणायला हरकत नाही. खांद्याची दुखापत होती. त्याचबरोबर धोनीला गुडघ्याचा इजा होती.”
“आम्ही सचिनला उचलण्याची जबाबदारी तरुण खेळाडूंवर सोपवली. त्यांना सांगितलं सचिनला उचला आणि मैदानात फिरवा. त्यामुळे विराट कोहलीची निवड झाली.”, असं विरेंद्र सेहवाग याने सांगितलं.
रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एकदा वनडे वर्ल्डकप जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेतला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या 8 ऑक्टोबरला पहिला सामना होणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडिया 8400 किमी प्रवास करत 9 शहरात जाणार आहे. 34 दिवसात टीम इंडिया इतका प्रवास करणार आहे.
भारतीय संघाने उपांत्य आणि अंतिम फेरीत धडक मारली तर टीम इंडिया 42 दिवसात 11 सामन्यांसाठी 9700 किमीचा प्रवास करेल. भारताचं शेड्युल पाहता सामना रात्री 11 वाजता संपले.त्या सामन्यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीय संघ विमान प्रवास करेल.