नवी दिल्ली : भारतानं (IND) आयर्लंड दौऱ्याची सुरुवात विजयानं केली. टीम इंडियानं डब्लिनमधील पहिला टी-20 (T-20) सामना 7 गडी राखून जिंकलाय. आता दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी झालीय. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला. 12-12 षटकांच्या या सामन्यात टीम इंडियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात 22 वर्षीय वेगवान गोलंदाज उमरान मलिकनं (Umaran Malik) भारताकडून पदार्पण केलंय. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात उमरानला चांगलाच महागात पडला. आयर्लंडविरुद्ध त्याला एकच षटक टाकाता आलं. यामध्ये त्यानं एक चौकार आणि एक षटकार मारून एकूण 14 धावा दिल्या. यानंतर कर्णधार हार्दिक पांड्यानं त्याला संधी दिली नाही. आता पुढे त्याला संधी मिळणार का, यावर हार्दिक पांड्या नेमकं काय म्हणाला, ते जाणून घ्या..
India skipper Hardik Pandya backs Umran Malik after 1st T20I against Ireland
हे सुद्धा वाचाRead @ANI Story | https://t.co/NCJmmFf6YE
#IrevsInd #HardikPandya #UmranMalik pic.twitter.com/jQQ53viDsZ— ANI Digital (@ani_digital) June 27, 2022
हार्दिक पांड्यानं सामन्यानंतर उमरान मलिकबद्दल सांगितलं ‘उमराननं फ्रँचायझी क्रिकेटसाठी चांगली कामगिरी केली आहे. माझ्याशी बोलल्यानंतर त्याला थांबवण्यात आलं, तो जुन्या चेंडूवर अधिक सोयीस्कर आहे. पण, येथे मला त्याच्यासाठी फारशी संधी दिसली नाही, आशा आहे की तो अधिक चांगलं खेळू शकेल. पुढच्या सामन्यात त्याला संधी देऊ.’ यासह तो म्हणाला की, “विजयानं मालिकेची सुरुवात करणं चांगलं आहे. एक संघ म्हणून विजयानं सुरुवात करणे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याबद्दल खूप आनंदी आहे. आयर्लंडनं शानदार फलंदाजी केली ज्यामुळे मी आमच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक बनलो. शेवटी पासलाही परत जावं लागलं. हॅरीनं खेळलेले काही शॉट्स मनाला भिडणारे होते,’ असंही हार्दिक यावेळी म्हणाला.
For his economical spell of 1/11 – @yuzi_chahal was the player of the match in the 1st T20I ??
A 7-wicket win for #TeamIndia to start off the 2-match T20I series against Ireland ?#IREvIND pic.twitter.com/eMIMjR9mTL
— BCCI (@BCCI) June 26, 2022
सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या दोन षटकांत संघाने दोन विकेट गमावल्या होत्या. भुवनेश्वर कुमारनं पहिल्याच षटकात कर्णधार अँड्र्यू बालबर्नीला क्लीन बोल्ड केलं. बलबर्नी शून्यावर बाद झाला. यानंतर भारतीय कर्णधार हार्दिक पांड्यानं दुसऱ्याच षटकात पॉल स्टर्लिंगला दीपक हुडाच्या गोलंदाजीवर झेलबाद केलं. स्टर्लिंगला चार धावा करता आल्या. यानंतर पाचव्या षटकात गॅरेथ डेलानी यष्टिरक्षक कार्तिकला आवेश खानकडून झेलबाद केलं. डेलेनी आठ धावा करू शकला. आयर्लंडनं 22 धावांत तीन विकेट गमावल्या.
त्यानंतर हॅरी आणि लॉर्कन टकर यांनी आयर्लंडचा डाव सांभाळला आणि चौथ्या विकेटसाठी 29 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली. युझवेंद्र चहलनं हॅरीला अक्षर पटेलकडून झेलबाद कंले. टकरला 16 चेंडूत 18 धावा करता आल्या. या खेळीत त्यानं दोन षटकार मारले. त्याचवेळी, हॅरी पहिल्या 30 चेंडूंमध्ये आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावलं.