Cricket : क्रिकेटमधील मॉन्स्टर परतला, तुफानी खेळीसमोर इंग्लंड नेस्तनाबूत, कोण आहे तो

| Updated on: Dec 13, 2023 | 4:14 PM

WI vs ENG : क्रिकेट विश्वात मॉन्स्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेळाडूने दमदार कमबॅक केलं होतं. दोन वर्षांनी कमबॅक करणाऱ्या खेळाडूने संघाला सामना जिंकून देत इतर संघांमध्येही दहशत पसरल्याचं दिसत आहे. कोण आहे तो खेळाडू?

Cricket : क्रिकेटमधील मॉन्स्टर परतला, तुफानी खेळीसमोर इंग्लंड नेस्तनाबूत, कोण आहे तो
England Cricket team
Follow us on

मुंबई : वर्ल्ड कप 2024 च्या पार्श्वभूमीवर जगभरातील सर्व टीम आता तयारीला लागलेल्या दिसत आहेत. टी-20 मालिका खेळत असून टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका सुरू आहे. तर दुसरीकडे इंग्लंड संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने विजय मिळवला असून वर्ल्ड कप विनर इंग्लंडला 4 विकेटने पराभूत केलं आहे. या सामन्यामध्ये क्रिकेटमधील मान्स्टर म्हणून ओळखला जाणारा खेळाडूने दमदार कमबॅक केलं आहे.

कोण आहे तो खेळाडू?

इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या सामन्यामध्ये कॅरेबियन संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचा संघ 19.2 ओव्हरमध्ये171 धावांवर ऑल आऊट झाला. वेस्ट इंडिज संघाने घातक मारा करत टी-20 मधील मजबूत मानल्या जाणाऱ्या संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचू दिलं नाही. वेस्ट इंडिजकडून कमबॅक करणाऱ्या रसल मसलने 4 ओव्हरमध्ये अवघ्या 14 धावा देत 3 विकेट घेतल्या. त्यासोबतच अल्जारी जोसेफ यानेही 3 विकेट घेतल्या मात्र त्याने 54 धावा दिल्या.

वेस्ट इंडिजचा संघ या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा चांगली सुरूवात केली होती.  32 धावांवर पहिली विकेट गमवलेली त्यानंतर काईल मेयर्स आणि शाई होप यांनी दुसऱ्या विकेटसाठी 27 चेंडूत 46 धावांची भागीदारी केली होती. या भागीदाराने सामन्यावर विंडिजने पकड मिळवली असं वाटत होतं. पण  14.4 ओव्हरपर्यंत विंडिजने पाच विकेट गमावल्या, त्यावेळी आंद्रे रसेल आणि रोमन पॉवेल यांनी आक्रमक पवित्रा घेतला. दोघांनी 21 चेंडूत 49 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

दरम्यान, कमबॅक करणाऱ्या रसेलने 14 बॉलमध्ये नाबाद 29 धावांची खेळी केली. 207 च्या स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या रसेल याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. रसेलचा कमबॅक सामना असल्यामुळे त्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र त्याने बॉलिंग आणि बॅटींगमध्ये दमदार कामगिरी करत संघाच्या विजयाच महत्त्वाची भूमिक बजावली.