WI vs IND 1st Odi | टीम इंडियाने टॉस जिंकला, कॅप्टन रोहित शर्मा याचा मोठा निर्णय

| Updated on: Jul 27, 2023 | 7:40 PM

West Indies vs Team India 1st Odi | टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्य एकदिवसीय सामन्यात टॉस जिंकला आहे. टीम इंडियाकडून युवा खेळाडूने पदार्पण केलं आहे.

WI vs IND 1st Odi | टीम इंडियाने टॉस जिंकला, कॅप्टन रोहित शर्मा याचा मोठा निर्णय
Follow us on

बारबाडोस | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून (27 जुलै) सुरुवात होत आहे. पहिल्या वनडे सामन्याचं आयोजन हे ब्रिजटाऊन बारबाडोस इथे करण्यात आलं आहे. पहिल्या सामन्याच्या टॉससाठी दोन्ही कॅप्टन शाई होप आणि रोहित शर्मा मैदानात आले. नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूने लागला आहे. टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने बॉलिंगचा निर्णय घेत विंडिजला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.

टीम इंडियाने टॉस जिंकला

अशी आहे टीम इंडिया

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये 5 बॅट्समन, 3 ऑलराउंडर आणि 3 गोलंदाजाचा समावेश आहे. रोहितसोबत शुबमन गिल हा ओपनिंग करणार आहे. मिडल ऑर्डरची जबाबदारी विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव यांच्यावर असणार आहे. त्यानंतर हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर हे ऑलराउंडर्सचं त्रिकूट आहे. कुलदीप यादव याच्याकडे फिरकीची जबाबदारी आहे. तर उमरान मलिक याच्यावर वेगवान मारा करण्याची जबाबदारी आहे.

मुकेश कुमार याचं एकदिवसीय पदार्पण

विंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेतून मुकेश कुमार या वेगवान गोलंदाजाने डेब्यू केलं आहे. मुकेशने याआधी विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सामन्यातून टेस्ट डेब्यू केलं होतं.

संजू सॅमसनला संधी नाहीच

दरम्यान प्लेईंग इलेव्हनमध्ये कॅप्टन रोहित शर्मा याने विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन आणि ईशान किशन या दोघांपैकी ईशान किशन याला संधी दिली आहे. संजूला संधी न दिल्याने नेटकऱ्यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायले मेयर्स, ब्रँडन किंग, अॅलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स आणि गुडाकेश मोती.