बार्बाडोस | वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियासमोर विजयासाठी 115 धावांचं आव्हान ठेवलं आहे. वेस्ट इंडिच्या फलंदाजांचा टीम इंडियाच्या फिरकीसमोर डब्बा गुल झाला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला 23 ओव्हरमध्ये 114 धावांवर ऑलआऊट केलं. विंडिजकडून फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. दोघे आले तसेच गेले. तर चौघांना 4 पेक्षा अधिक रन्सही करता आल्या नाहीत. टीम इंडियाच्या फिरकीमुळे विंडिजचा डाव झटपट आटोपला.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच विंडिजला धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात केली. हार्दिक पंड्या, डेब्यूटंट मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकरू या तिघ्या वेगवान गोलंदाजांनी विंडिजला पहिले 3 झटके दिले. त्यानंतर कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा या फिरकी जोडीने विंडिजचा सुपडा साफ केला.
विंडिजकडून कॅप्टन शाई होप याने 43 धावांची खेळी केली. त्यामुळे विंडिजला 100 पार मजली मारली. ओपनर ब्रँडन किंग याने 17, एलिक अथानाजे याने 22 तर शिमरॉन हेटमायर याने 11 रन्स केल्या. तर इतरांना विशेष काही करण्याआधीच भारतीय गोलंदाजांनी रोखलं.
टीम इंडियाला विजयासाठी 115 धावांचे आव्हान
Innings break!
A wonderful bowling display from #TeamIndia restricts West Indies to 114 ??
4️⃣ wickets for @imkuldeep18
3️⃣ wickets for @imjadeja
A wicket each for @hardikpandya7, @imShard, & debutant Mukesh KumarScorecard – https://t.co/OoIwxCvNlQ……#WIvIND pic.twitter.com/ctMLaYNJbn
— BCCI (@BCCI) July 27, 2023
टीम इंडियाकडून कुलदीप यादव याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. कुलदीपने 3 ओव्हरमधून 2 ओव्हर मेडन टाकल्या. कुलदीपने 2 च्या इकॉनॉमी रेटने अवघ्या 6 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स पटकावल्या. रविंद्र जडेजा याने 6 ओव्हरमध्ये 37 धावा देत 3 फलंदाजांचा काटा काढला. तर शार्दुल ठाकूर, हार्दिक पंड्या आणि मुकेश कुमार या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. अॅलिक अथानाझे हा डेब्यूटंट मुकेश कुमार याचा पहिला शिकार ठरला.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायले मेयर्स, ब्रँडन किंग, अॅलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स आणि गुडाकेश मोती.