WI vs IND 1st T20i Live Streaming | टी 20 मालिका गुरुवारपासून, पहिला सामना कधी कुठे?

| Updated on: Aug 02, 2023 | 11:30 PM

West Indies vs India 1st T20I | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 3 ऑगस्टपासून 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे.

WI vs IND 1st T20i Live Streaming | टी 20 मालिका गुरुवारपासून, पहिला सामना कधी कुठे?
Follow us on

त्रिनिदाद | टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धची कसोटी मालिका 1-0 आणि वनडे सीरिज 2-1 अशा फरकाने जिंकली. आता विंडिज दौऱ्यातील शेवटच्या मालिकेला अर्थात टी 20 सीरिजला 3 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. ही मालिका एकूण 5 सामन्यांची असणार आहे. या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघ सज्ज आहेत. मालिकेतील हिला सामना हा गुरुवारी 3 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येईल, सामन्यातला किती वाजता सुरुवात होईल, हे आपण जाणून घेऊयात.

विंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20 सामना केव्हा?

वेस्ट इंडिज विरुद्ध इंडिया यांच्यातील पहिली टी 20 मॅच 3 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे.

विंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिली टी 20 मॅच कोणत्या स्टेडियममध्ये?

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला टी 20 सामना हा ब्रायन लारा स्टेडियम, तारुबा, त्रिनिदाद इथे आयोजित करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

विंडिज विरुद्ध टीम इंडिया सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील या पहिल्या टी 20 मॅचला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता होणार आहे. तर त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

विंडिज विरुद्ध इंडिया पहिली टी 20 मॅच टीव्हीवर कुठे पाहता येणार? (wi vs ind 1st t20i live straming)

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला टी 20 सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहता येईल.

विंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिली टी 20 मॅच मोबाईवर कुठे पाहता येईल?

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला टी 20 सामना हा मोबाईलवर फॅनकोड एपवर पाहता येईल.

टी 20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट टीम

रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), कायले मेयर्स (उपकर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ओशाने थॉमस, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅककॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड आणि ओडियन स्मिथ.

टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया

हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.