त्रिनिदाद | टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यातील शेवटची मालिका खेळत आहे. विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 5 सामन्यांची टी 20 मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. या टी 20 मालिकेतील पहिला सामना हा ब्रायन लारा स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. पहिल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा वेस्ट इंडिजच्या बाजूने गेला. कॅप्टन रोवमेन पॉवेल याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. तर टीम इंडियाच्या 2 खेळाडूंना लॉटरी लागली.
टी 20 मालिकेत हार्दिक पंड्या टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. हार्दिकने टॉसनंतर टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन जाहीर केली. यामुळे 2 खेळाडूंना लॉटरी लागली. टीम इंडियाकडून 2 युवा खेळाडूंनी टी 20 पदार्पण केलं. तिलक वर्मा आणि मुकेश कुमार या दोघांनी डेब्यू केलं. तिलकने या मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलंय. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी तिलकला ही संधी मिळाली. तिलकने आयपीएल 16 व्या मोसमात रोहित शर्मा याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्ससाठी चमकदार कामगिरी केली होती.
तर मुकेश कुमार याचंही टी 20 डेब्यू झालंय. मुकेशने यासह विंडिज दौऱ्यातच तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पण केलं. महत्वाची बाब म्हणजे मुकेशचं 15 दिवसातील हे तिसरं पदार्पण ठरलंय. मुकेशने विंडिज विरुद्ध 20 जुलै रोजी टेस्ट, 27 जुलैला वनडे आणि त्यानंतर आता 3 ऑगस्टला टी 20 पदार्पण केलंय.
दरम्यान मुकेश कुमार याने गेल्या वर्षी एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत मुकेशने आयपीएल ट्रायलबाबत प्रतिक्रिया दिली होती. “या वर्षी नक्कीच दरवाजा तुटेल”, असं मुकेश तेव्हा म्हणाला होता. मुकेशने म्हटलेलं खरं ठरलं अन् त्याने दरवाजा तोडला.
आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिट्ल्स टीमने मुकेशला आपल्या ताफ्यात घेतलं होतं. दिल्लीने मुकेशसाठी 5 कोटी 50 लाख रुपये मोजले होते. अजब बाब म्हणजे मुकेश कुमार याची आधी टीम इंडिया आणि त्यानंतर आयपीएलमध्ये निवड झाली. मुकेश कुमार याची दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या होम सीरिजसाठी निवड करण्यात आली होती. मात्र तेव्हा मुकेशला पदार्पणाची संधी देण्यात आली नव्हती.
टीम इंडियाकडून स्वागत
? "Be proud of yourself."
Huddle talk from captain Hardik Pandya as Tilak Varma & Mukesh Kumar make their T20I debuts ?#TeamIndia | #WIvIND | @hardikpandya7 | @yuzi_chahal | @TilakV9 pic.twitter.com/yd0G3qctG2
— BCCI (@BCCI) August 3, 2023
कॅप्टन हार्दिक पंड्या याने तिलक वर्मा याला कॅप दिली. तर युजवेंद्र चहल याने मुकेश कुमार याला टीम इंडियाची कॅप सोपावली. त्यानंतर मुकेश आणि तिलक या दोघांचं टीम इंडियाच्या इतर खेळाडूंनी अभिनंदन केलं.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडीज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पावेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय.